छत्रपती साखर कारखान्याची 
प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध

छत्रपती साखर कारखान्याची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध

Published on

वालचंदनगर, ता. ११ ः भवानीनगर (ता.इंदापूर ) येथील श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध झाली आहे. या यादीवर हरकती नोंदविण्यासाठी २० जुलै २०२३ पर्यंत मुदत असेल. कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक गेल्या तीन वर्षांपासून रखडली होती. सर्वोच्च न्यायालयाने चार महिन्यांत निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्याचा आदेश दिल्यानंतर साखर आयुक्तालयाच्या प्राधिकरणाने निवडणुकीची प्रक्रिया सुरू केली आहे.

जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी यांनी सोमवारी प्रारूप मतदार यादीची अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. प्रारूप मतदार यादीत २९,५०० मतदार असून यामध्ये मयत व इतर सभासदांचा ही समावेश आहे. प्रारूप मतदार यादी उद्यापासून (ता. १२) श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या कार्यालयासह सहाय्यक निबंधक कार्यालय इंदापूर, तहसील कार्यालय इंदापूर व साखर आयुक्त कार्यालय पुणे येथे पाहण्यासाठी उपलब्ध आहेत. २८ जुलैपर्यंत हरकतींवर सुनावणी होणार असून २ ऑगस्ट २०२३ रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होईल.

गेल्या आठवड्यात वाद
श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या क्रियाशील व अक्रियाशील सभासदांवरून कारखान्याचे संचालक मंडळ व शेतकरी कृती समिती आमने-सामने आले होते. दोघांमध्ये बाचाबाची झाल्याचा प्रकार गेल्या आठवड्यामध्ये घडला होता. प्रसिद्ध झालेल्या प्रारूप मतदार यादी वर किती हरकती येतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.