शेठ चिमणलाल मेमोरिअल ट्रस्टचे पुरस्कार जाहीर

शेठ चिमणलाल मेमोरिअल ट्रस्टचे पुरस्कार जाहीर

पुणे, ता. १८ : शेठ चिमणलाल गोविंददास मेमोरिअल ट्रस्टतर्फे दरवर्षी देण्यात येणाऱ्या उद्यमगौरव आणि सेवागौरव पुरस्कारांची मंगळवारी (ता. १८) घोषणा केली. यंदाचा उद्योग क्षेत्रासाठीचा स्व.चिमणलाल गोविंददास उद्यमगौरव पुरस्कार औरंगाबाद जिल्ह्यातील वाळूज येथील यशश्री ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजचे मिलिंद कंक यांना, व्यापार क्षेत्रासाठीचा स्व.चिमणलाल गोविंददास उद्यमगौरव पुरस्कार पुणे येथील हिंद साडी सेंटरचे डाह्यालाल शाह यांना, तर शिक्षण क्षेत्रासाठीचा स्व. चिमणलाल गोविंददास सेवागौरव पुरस्कार कोल्हापूरमधील शिरदवाड येथील विद्योदय मुक्तांगण परिवार फौंडेशनचे विनायक माळी यांना आणि सामाजिक क्षेत्रासाठीचा स्व. चिमणलाल गोविंददास सेवागौरव पुरस्कार चिंचवडगाव येथील दिव्यांग प्रतिष्ठानचे हरीश सरडे यांना जाहीर करण्यात आला आहे. प्रत्येकी रुपये ५० हजार असे या पुरस्कारांचे स्वरूप आहे. रविवार (ता. २३) सकाळी दहा वाजता दादासाहेब केतकर सभागृह, मुक्तांगण इंग्लिश मीडियम शाळा, शिवदर्शन चौक, अरण्येश्वर येथे या पुरस्काराचे वितरण होणार आहे, अशी माहिती ट्रस्टचे अध्यक्ष मोहन गुजराथी यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी ट्रस्टचे जयंत गुजराथी, कन्हैयालाल गुजराथी आणि डॉ. नलिनी गुजराथी आदी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com