घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा इशारा

घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा इशारा

पुणे, ता. १८ : हवामान विभागाने घाटमाथ्यावर मुसळधारांचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर संभाव्य आपत्तीला तोंड देण्यासाठी जिल्हा प्रशासनाचा आपत्ती व्यवस्थापन कक्ष सतर्क झाला आहे. दरम्यान जिल्ह्यातील पूर आणि दरडप्रवण गावांतील ग्रामस्थांना देखील सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

रुग्णालये, खाटा, प्राणवायू, कृत्रिम श्वसन यंत्रणा आदींचे व्यवस्थापन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे. दुर्दैवाने आपत्ती घडल्यास बोटी, सुटकेची साधनसामग्री सज्ज ठेवण्यात आली आहे. उपजिल्हा रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र या ठिकाणांवरील यंत्रणा, यंत्रसामुग्री आणि पुरेसे मनुष्यबळ आदींबाबत व्यवस्था केली आहे. रुग्णवाहिका, जीप इतर वाहने तसेच स्थानिक डॅाक्टर, स्वयंसेवी संघटना यांच्याशी समन्वय ठेवला असून जेणेकरून आपत्ती काळात मदत घेता येणे शक्य होणार आहे, अशी माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी विठ्ठल बनोटे यांनी दिली.

जिल्ह्यातील जुने पूल, इमारती यांची बांधकाम तपासणी, आणिबाणीच्या वेळी उपयोगात येणारे बुलडोझर, झाडे कापण्याचे कटर, जनरेटर, आरसीसी कटर चालू स्थितीमध्ये ठेवण्याच्या सूचना सार्वजनिक बांधकाम विभागाला दिल्या आहेत. वादळी वाऱ्यासह होणाऱ्या पावसामुळे झाडे पडून मनुष्य, तसेच वित्तहानी होऊ नये म्हणून धोकादायक झाडांची छाटणी करणे, महापालिका क्षेत्रात आपत्तीजन्य घटनांची माहिती जिल्हा नियंत्रण कक्षाला देण्याची सूचना पुणे, पिंपरी चिंचवड महापालिका प्रशासनाला जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत. याबरोबरच जिल्हा परिषद, पोलिस प्रशासन, नागरी संरक्षण दल, महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ, औद्योगिक व आरोग्य सुरक्षा विभाग, हवामान खाते, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार यांनाही विविध सूचना दिल्या आहेत, असेही ते म्हणाले.
-----------
संकटकाळी नियंत्रण कक्षाशी संपर्क साधा
शहरासह जिल्ह्यात पूरग्रस्त परिस्थिती ओढवल्यास १०७७ या टोल फ्री आणि जिल्हाधिकारी कार्यालयाच्या ०२०-२६१२३३७१ या क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील पूरप्रवण आणि दरप्रवण गावांमध्ये पावसाळ्यात काय
काळजी घ्यायची याबाबत जिल्हा प्रशासनाकडून प्रशिक्षण देण्यात आले आहे.
----

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com