चुकवू नये असे काही

चुकवू नये असे काही

१) मुक्त संगीत चर्चासत्र
गानवर्धन संस्था आणि उपाध्ये व्हायोलिन अकादमीच्या स्वरझंकार ज्ञानपीठातर्फे दोन दिवसीय मुक्त संगीत चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. प्रसिद्ध सिंथेसायझर आणि अकॉर्डियन वादक विवेक परांजपे पहिल्या दिवशी प्रात्यक्षिकांसह अनुभव कथन करणार आहेत. दुसऱ्या दिवशी पंडित कुमार गंधर्व यांच्या जन्मशताब्दीनिमित्त त्यांचे ज्येष्ठ शिष्य पं. सत्यशील देशपांडे हे ‌‘कुमार गंधर्व गायकी व परंपरा’ या विषयावर विवेचनासह सादरीकरण करणार आहेत.
कधी ः शुक्रवार (ता. २८) आणि शनिवार (ता. २९)
केव्हा ः सायंकाळी ५.३० ते ८.३०
कुठे ः एस. एम. जोशी, सभागृह

२) ‘काव्यात रंगले मी’
साहित्यप्रेमी भगिनी मंडळातर्फे प्रसिद्ध कवयित्री पद्मा गोळे यांच्या स्मरणार्थ ‘काव्यात रंगले मी’ या काव्यविषयक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात ज्येष्ठ कवयित्री डॉ. संगीता बर्वे आणि युवा कवयित्री हर्षदा सुंठणकर या काव्य सादरीकरणासह आपला काव्यप्रवास उलगडणार आहेत.
कधी ः शुक्रवार (ता. २८)
केव्हा ः सायंकाळी ५.३० वाजता
कुठे ः महाराष्ट्र साहित्य परिषद, टिळक रस्ता

३) एकांकिका सादरीकरण ः
साधना कला मंचातर्फे दोन एकांकिकांच्या सादरीकरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. लेखक-दिग्दर्शक योगेश सोमण यांच्या ‘माहेर’ आणि ‘वन सेंकद्‍स लाइफ’ या दोन एकांकिका यावेळी सादर होणार आहेत. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या कला महाविद्यालयाच्या नाट्य विभागातील कलाकार हे सादरीकरण करणार आहेत.
कधी ः शनिवार (ता. २९)
केव्हा ः सायंकाळी ५.३० वाजता
कुठे ः हॅपी कॉलनी फेडरेशन सभागृह, हॅपी कॉलनी लेन क्रमांक १, कोथरूड

४) ‘चित्रमाऊली’
प्रसिद्ध अभिनेत्री सुलोचना दीदी यांचा जीवनप्रवास ‌‘चित्रमाऊली’ या एक तासाच्या लघुपटाद्वारे रसिकांसमोर उलगडणार आहे. पूना गेस्ट हाऊस स्नेह मंचातर्फे आयोजित या कार्यक्रमात सुलोचना दीदींच्या जन्मदिनानिमित्त हा लघुपट प्रथमच प्रदर्शित होत आहे. ‘फिल्म्स डिव्हिजन’ने या लघुपटाची निर्मिती केली असून त्याचे दिग्दर्शन शैलेश शेट्ये यांचे आहे. लघुपटाच्या प्रदर्शनानंतर सुलोचना दीदी यांच्यावर चित्रित झालेल्या चित्रपट गीतांचा कार्यक्रम गायिका मनिषा निश्चल वाद्यवृंदासह सादर करणार आहेत.
कधी ः रविवार (ता. ३०)
केव्हा ः दुपारी १२ वाजता
कुठे ः एस. एम. जोशी सभागृह, नवी पेठ

५) ‘परंपरा’
‘ऋत्विक फाउंडेशन फॉर परफॉर्मिंग आर्ट्स’तर्फे विविध कला प्रकारांतील गुरू-शिष्यांना एका मंचावर आणण्याचा ‌‘परंपरा’ हा नावीन्यपूर्ण उपक्रम सुरू करण्यात आला आहे. या ‌‘परंपरा’ मालिकेतील दुसरे पुष्प ज्येष्ठ कथक नृत्यगुरू शमा भाटे या सहकलाकारांसह गुंफणार आहेत. भाटे यांच्यासह अमिरा पाटणकर, अवनी गद्रे, भार्गवी सरदेसाई, ईशा नानल, श्रद्धा मुखडे, श्रीया कुलकर्णी, प्रचिती भावे, प्रमोद वाघ हे या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.
कधी ः रविवार (ता. ३०)
केव्हा ः सायंकाळी ५ वाजता
कुठे ः ऋत्विक फाउंडेशन फॉर परफॉर्मिंग आर्ट्स, प्लॉट क्रमांक १७, वेद भवन मागे, कोथरूड

६) ‘नमक, यमक आणि गमक’
ज्येष्ठ प्रयोगकला-तज्ज्ञ डॉ. अशोक रानडे यांच्या बाराव्या स्मृतिदिनानिमित्त महाराष्ट्र कल्चरल सेंटर संचालित ‘डॉ. अशोक दा. रानडे अर्काईव्हज’तर्फे ‘नमक, यमक आणि गमक’ हा विशेष कार्यक्रम सादर होणार आहे. संगीत, नाटक, ऑपेरा, नाटकगाणी, गायकांचे हातवारे, अभिरुची, माध्यमांचे आक्रमण अशा अनेकविध पैलूंवर डॉ. रानडे लिखित लेखांचे अभिवाचन आणि त्या अनुषंगाने
निवडक संगीतांश असे या प्रस्तुतीचे स्वरूप आहे. हर्षद राजपाठक, श्रुती कुंटे आणि डॉ. चैतन्य कुंटे हे लेखांचे अभिवाचन करतील.
कधी ः रविवार (ता. ३०)
केव्हा ः सायंकाळी ५.३० वाजता
कुठे ः रंगालय, चौथा मजला - ज्योत्स्ना भोळे सभागृह इमारत, हिराबाग चौक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com