युट्यूब सामग्री निर्माता होण्याची संधी

युट्यूब सामग्री निर्माता होण्याची संधी

Published on

पुणे, ता. २६ : युट्यूब हे माध्यम सर्जनशीलतेला मुक्त वाव देणारे व आवडीचे काम इतरांपर्यंत पोचविणारे क्षेत्र आहे. अर्ध-वेळ किंवा पूर्ण-वेळ युट्यूबर हे या काळात कौशल्याधारित युवकांसाठी उपलब्ध असलेला एक चांगला व्यवसाय आहे. या पार्श्वभूमीवर दिग्दर्शक शिवाजी कचरे यांची ‘युट्यूब सामग्री निर्माता’ ही तीन दिवसीय कार्यशाळा शनिवारपासून (ता. २९) आयोजिली आहे. ज्यांना युट्यूब व इतर माध्यमांद्वारे सामग्री निर्माता व्हायचे आहे अथवा जे आधीच असे निर्माते आहेत त्यांना स्वतःची पोहोच वाढवायची आहे, त्यांच्यासाठी ही कार्यशाळा उपयुक्त ठरणार आहे. प्रतिव्यक्ती शुल्क चार हजार रुपये अधिक वस्तू व सेवा कर.

याबाबत मिळणार प्रशिक्षण
युट्यूब विश्लेषण, लघुपट निर्मिती, निर्मितीपूर्व कामे, सामग्री निर्माण करण्याचे तंत्र व धोरण, निर्मितीनंतरची कामे, सामग्रीचे संक्रमण, विपणन, एसईओ व अधिकाधिक प्रेक्षकांपर्यंत पोचण्याचे विविध तांत्रिक मार्ग, हक्क आणि कायदेशीर बाबी.

कृषी व ग्रामीण पर्यटन उद्योग
महाराष्ट्र पर्यटन संचालनालयाने २०२० मध्ये कृषी व ग्रामीण पर्यटन विकासासाठी अध्यादेश काढून या क्षेत्राला प्रोत्साहन दिले आहे. त्यानंतर कृषी पर्यटन केंद्रांच्या उभारणीत झपाट्याने वाढ झाली असली तरी कृषी व ग्रामीण पर्यटन उद्योगासमोरची आव्हाने तेवढ्या प्रमाणात उभी राहिली आहेत. त्यामुळे या व्यवसायाची वाढ कशी करावी?, त्याचे मार्ग कोणते?, याबाबत मार्गदर्शन करणारी दोन दिवसांची कार्यशाळा ५ व ६ ऑगस्ट रोजी ‘सकाळ’ व ‘ॲग्रोवन’ संलग्न शैक्षणिक संस्था ‘एसआयआयएलसी’ने आयोजिली आहे. कृषी पर्यटन क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या तसेच नव्याने कृषी व ग्रामीण पर्यटन केंद्र उभारू इच्छिणाऱ्यांसाठी ही कार्यशाळा उपयुक्त आहे. प्रतिव्यक्ती शुल्क ३५४० रुपये.

तज्ज्ञ मार्गदर्शक ः मनोज हाडवळे (संचालक, पराशर कृषी व ग्रामीण पर्यटन) व सोमनाथ नागवडे (समाज माध्यम विपणन तज्ज्ञ)

कार्यशाळेतील विषय...
- कृषी पर्यटनाचे घटक व प्रकार
- कृषी पर्यटनातील पायाभूत सोयी-सुविधा व लँडस्केपिंगचे महत्त्व
- शाश्वत व जबाबदार कृषी पर्यटन कसे उभारावे व वाढवावे
- विपणनाची प्रभावी साधने
- व्यवसाय वाढीसाठी समाज माध्यमांचा प्रभावी वापर
- छायाचित्रण व व्हिडीओग्राफीची मूलभूत माहिती
ठिकाण ः सकाळ मीडिया सेंटर, सकाळनगर, बाणेर रस्ता, औंध, पुणे
संपर्क ः ९१४६०३८०३१, ८९५६३४४४७२

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.