इर्शाळवाडीसाठी मदतीचा ओघ

इर्शाळवाडीसाठी मदतीचा ओघ

Published on

पुणे, ता. २६ ः रायगड जिल्ह्यातील खालापूरजवळील इर्शाळवाडी गावावर दरड कोसळून संपूर्ण गाव ढिगाऱ्याखाली गाडले गेले. तेथील पुनर्वसनासाठी केलेल्या मदतीच्या आवाहनाला समाजातून चांगला प्रतिसाद मिळत असून, ‘सकाळ रिलीफ फंडा’कडे २० लाख रुपयांचा निधी जमा झाला आहे.

आईच्या स्मरणार्थ मदत
पुण्यातील शिरोळे रस्ता येथील ऊर्मिला व उदयसिंग शिंदे या ज्येष्ठ दांपत्याने ताराबाई वसंतराव शिरोळे (ऊर्मिला शिंदे यांच्या आई) यांच्या स्मरणार्थ इर्शाळवाडीसाठी ‘सकाळ रिलीफ फंडा’ला एक लाख रुपयांची मदत दिली. ऊर्मिला शिंदे म्हणाल्या, ‘‘लहान मुलांना शालेय जीवनापासूनच सामाजिक जाणीव होऊन आपद्ग्रस्तांना मदतीची सवय लागावी म्हणून नातीसमवेत मदतीचा धनादेश सुपूर्त करत आहे.’’


सिंधू दीक्षित यांच्या स्मरणार्थ ५० हजार
पुण्यातील प्रभात रस्ता येथील वैजयंती सोवनी यांनी सिंधू दीक्षित यांच्या स्मरणार्थ इर्शाळवाडीसाठी ‘सकाळ रिलीफ फंडा’कडे ५० हजार रुपयांचा धनादेश सुपूर्त केला.

व्यक्तिगत स्वरूपात मोलाची मदत
अतुल कुलकर्णी, प्रमोद सोनावणे, रोहित खिरोडे यांनी प्रत्येकी तीन हजार रुपयांची तर संजय गोविंदराव, रजत भोसरकर, धनंजय दोडके, आरती जोगळेकर, अभय गांधी, विजय कामत, सदानंद वांजळे, अंकिता पानसे, हेमंत देशपांडे यांनी प्रत्येकी पाच हजार रुपयांची मदत केली.
त्याचप्रमाणे रुचिरा नाईक, रूपेश सावंत, चेतन हटकर, सुरेश धुरे, नितीन खातले, उदयमित्र मुक्तिबोध, मंदार कदम, प्रदीप कुमरे, राजेंद्र स्वामी, सुलभा अघरकर, अभिजित पाटील, राहुल लांडगे, दत्तनाथ धनावडे, मानसी शहा, मिलिंद माने, सुशांत गायकवाड यांनी प्रत्येकी दोन हजार रुपयांची मदत केली.
सुशांत गायकवाड, रोटोमॅटिक कॉर्पोरेशन, कल्पना गुप्ता, संजय इनामदार, रवींद्र भोसले, साहेबराव ढाणे, जयंत कगिरे, जितेंद्र इंगोले, सविता बहिरट, समर्थ जेवळीकर, वैशाली भोसले, राहुल वडघुले, प्रदीपकुमार कदम, विवेकानंद राणे, मयूर महाजन, राजू जोपाळे, अरुण पाटील, अवधूत पांढरे, शीतल जानराव, दीपक मानकर, संदीप फणसाळकर, प्रियांका कपूर, राहुल जिनराळकर, पोपट पवार, किरण आहिरे, आशिष पेटकर यांनी प्रत्येकी एक हजार रुपयांची मदत केली. पुनीत राऊत, विठ्ठल घाडगे, महेंद्र पवार, मेघना कुलकर्णी, कमलेश भोये, स्मिता महाडीक, सविता काळे, संगीता सुतार, स्वप्नील वाघमोडे, गौरव गांधी, शिरीष आवटी, शीतल पाटील, उत्कर्ष बेटोदकर, आजिनाथ दहिफळे, डॉ. बिपिन सुळे, शिवानंद साखरे यांनी प्रत्येकी ५०० रुपयांची मदत केली.
याशिवाय शरद मुजुमदार १५०० रुपये, आनंदराव सूर्यवंशी २१०० रुपये, राजमल फुलपगार २३०० रुपये, मनीष राऊत २५०० रुपये, खुशबू फुलपगार २७०० रुपये, रोहन दास्ताने ४००० रुपये, हृषिकेश बोरनारे ५५५५ रुपये, गिरीश भाके ७५०० रुपये, संजय खराडे १० हजार रुपये, शशिकला पवार ११ हजार रुपये तर दीनानाथ पाटील यांनी ११,१११ रुपयांची मदत केली आहे

अशी करा मदत...
१. HDFC Bank
A/C No : ५७५०००००४२७८२२
IFSC : HDFC००००१०३
Branch - FC Road , Pune.
या खात्यावर देणगीची रक्कम ऑनलाइन पद्धतीने बँक ट्रान्स्फर करू शकता.

२. https://sakalrelieffund.com/ या संकेतस्थळावर जाऊन डोनेट नाऊ या बटणावर क्लिक करून देणगीची रक्कम डेबिट वा क्रेडिट कार्ड आणि बँक ट्रान्स्फरमार्फत पाठवू शकता. किंवा सोबतचा क्यूआर कोड स्कॅन करून देणगी देऊ शकता.
३. मदतीचा धनादेश दैनिक ‘सकाळ’च्या कार्यालयात सकाळी ११ ते ५ या वेळेत स्वीकारले जातील.
- ‘सकाळ रिलीफ फंडा’साठीच्या देणग्या प्राप्तिकर कायद्याच्या ८० जी कलमांतर्गत प्राप्तिकर सवलतीस पात्र आहेत.
- अधिक माहितीसाठी संपर्क : ८६०५०१७३६६

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.