गोळी झाडून घेऊन पोलिसाची आत्महत्या

गोळी झाडून घेऊन पोलिसाची आत्महत्या

Published on

पुणे, ता. २६ : लग्नानंतर आठवडाभरातच कारागृहातील एका पोलिस कर्मचाऱ्याने स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केल्याची घटना समोर आली. या प्रकरणी एका महिलेसह सहा जणांविरुद्ध येरवडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमोल मुरलीधर माने (वय २८) असे आत्महत्या केलेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे. या प्रकरणी पोलिस उपनिरीक्षक भगवान सदाशिव गुरव यांनी फिर्याद दिली. पल्लवी दिनकर धुमाळ (रा. येरवडा कारागृह वसाहत), दिनकर रंगोबा धुमाळ (वय ५७, रा. विजय पार्क, विद्यानगर), प्रतीक दिनकर धुमाळ, रोहिदास मुरलीधर निगडे (वय ५२), सोहम निगडे, रोहित साहु लॅबवाला अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पल्लवीने अमोल याला विवाहास नकार दिला होता. पल्लवी आणि नातेवाईकांनी, अमोलला तुझ्याविरुद्ध पोलिसात तक्रार केल्यास निलंबित होईल, अशी धमकी दिली होती. दरम्यान, अमोलने जानेवारी महिन्यात दुसऱ्या तरुणीशी लग्न केले. विवाहानंतर तो पुन्हा कारागृहात रुजू झाला. परंतु पुन्हा पल्लवी आणि नातेवाईकांनी त्याला बदनामी करण्याची धमकी दिली होती. त्यानंतर अमोलने कारागृहात बंदुकीतून गोळी झाडून आत्महत्या केली होती. आत्महत्येपूर्वी त्याने मोबाईलवर संदेश लिहिला होता. त्यावरून पोलिसांनी तपास करून सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.