मेट्रो फायदेशीर,खासगी वाहनांचा वापर नको

मेट्रो फायदेशीर,खासगी वाहनांचा वापर नको

(या बातमीत पाटील यांचा हाफ कॉलम फोटो वापरावा)


पुणेकरांनो, फायदेशीर मेट्रोला पसंती द्या
चंद्रकांत पाटील ः खासगी वाहने कमीत कमी वापरा
पुणे, ता. ३१ ः ‘‘मेट्रोच्या विस्तारित मार्गांचा दुसरा टप्पा आता सुरु होत आहे. मेट्रोमुळे पुणेकरांचा प्रवासाचा वेळ वाचणार आहे. याशिवाय इंधनाचीही बचत होणार आहे. त्यामुळे पुणेकरांनी खासगी वाहनांचा कमीत कमी वापर करावा आणि फायदेशीर मेट्रोला प्राधान्य द्यावे,’’ असे आवाहन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी येथे केले. मेट्रोचा पुढचा टप्पा डिसेंबरअखेरीस पूर्ण होणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मंगळवारी पुणे दौऱ्यावर येत आहे. यावेळी ते मेट्रोच्या विस्तारित मार्गांचे उद्घाटन करणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री पाटील यांनी सोमवारी शिवाजीनगर न्यायालय स्थानकाची पाहणी केली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, ‘‘ ज्या वेळी मेट्रोचा पहिला टप्पा सुरु झाला. तेव्हा नागरिकांनी उत्सुकतेपोटी मेट्रोने प्रवास केला. त्यांनी स्थानकावर गर्दी केली. नंतर मात्र प्रवाशांची संख्या कमी झाली. आता मात्र मेट्रोचा मोठा टप्पा सुरु होत असल्यामुळे प्रवाशांना त्याचा वापर करता येईल. त्यामुळे मेट्रोचा प्रवास पुणेकरांना फायदेशीर ठरणार आहे. मंगळवार सायंकाळी पाच वाजल्यापासून प्रवाशांना मेट्रोने प्रवास करता येईल.’’
मेट्रोचा पुढचा टप्पा रूबी हॉल ते रामवाडी आणि शिवाजीनगर न्यायालय ते स्वारगेट दरम्यानची वाहतूक येत्या डिसेंबरपर्यंत खुली होणार आहे. त्यामुळे पुण्यातील पहिल्या टप्प्यातील मेट्रो प्रकल्प मार्गी लागेल.
दरम्यान, मेट्रोच्या विस्तारित मार्गांच्या मंजुरीसाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा सुरू असून अल्पावधीतच त्याचेही काम सुरू होईल, असेही पाटील यांनी नमूद केले. या वेळी मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर, प्रकल्प संचालक अतुल गाडगीळ, सरव्यवस्थापक हेमंत सोनवणे आदी उपस्थित होते.
-----

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com