गुन्हे वृत्त

गुन्हे वृत्त

पीएमपी बसच्या धडकेने ज्येष्ठ महिलेचा मृत्यू
पुणे, ता. ३१ : भरधाव पीएमपी बसने धडक दिल्यामुळे एका ज्येष्ठ महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घोरपडी गावात शनिवारी (ता. २९) दुपारी घडली.
उमाबाई रानबा धेंडे (वय ७७, रा. आगवाली चाळ, घोरपडी गाव) असे मृत्युमुखी पडलेल्या महिलेचे नाव आहे. या प्रकरणी शशांक धेंडे (वय ३२) यांनी फिर्याद दिली. त्यावरून मुंढवा पोलिसांनी पीएमपी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. उमाबाई धेंडे घोरपडी गावातील अनंत चित्रपटगृहाजवळ रस्ता ओलांडत होत्या. त्यावेळी पीएमपी बसने त्यांना धडक दिली. या अपघातात गंभीर जखमी झाल्यामुळे उमाबाई यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. अपघातानंतर पीएमपी बसचालक पसार झाला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक अनिल बिनवडे करीत आहेत.

संभाजी उद्यानातील मत्स्यालयात आग
पुणे, ता. ३१ : संभाजी उद्यानातील मत्स्यालयात असलेल्या वातानुकूलित यंत्रणेने पेट घेतल्याची घटना रविवारी (ता. ३०) रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास घडली. अग्निशामक दलाच्या जवानांनी तातडीने आग आटोक्यात आणल्यामुळे अनर्थ टळला. संभाजी उद्यानातील मत्स्यालयातील दोन वातानुकूलित यंत्रांनी पेट घेतला. भिंती फोम आणि फायबरच्या असल्यामुळे मोठ्या प्रमाणावर धूर झाला होता. याबाबत माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या कसबा आणि एरंडवणे केंद्रातील जवान घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पंधरा मिनिटांत आग आटोक्यात आणली. मत्स्यालयास आगीची झळ पोचली नसल्याची माहिती अग्निशमन दलाने दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com