रात्री उशिरापर्यंत पार्ट्या सुरू ठेवणाऱ्या हॉटेलांवर कारवार्इ करावी

रात्री उशिरापर्यंत पार्ट्या सुरू ठेवणाऱ्या हॉटेलांवर कारवार्इ करावी

‘भांडारकर''वरील काही हॉटेलांविरुद्ध तक्रार
रात्री उशिरापर्यंत चालणाऱ्या पार्ट्यांमुळे नागरिक त्रस्त

पुणे, ता. २१ : भांडारकर रस्त्यावरील लेन क्रमांक आठ आणि नऊ या परिसरातील काही हॉटेलांमध्ये रात्री उशिरापर्यंत ध्वनिवर्धक मोठ्या आवाजात लावून पार्ट्या चालतात. संबंधित हॉटेल चालकांवर त्वरित कारवार्इ करावी अशी मागणी ‘रणजित हॉटेल परिसर नागरिक संघटने’ने पुणे महापालिकेकडे केली आहे.
या भागातील एका हॉटेलात बेकायदेशीर बदल करण्यात आल्यावरून डेक्कन पोलिस ठाण्यात काही महिन्यांपूर्वी गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतरही हॉटेलमुळे होणारा त्रास थांबला नसल्याची स्थानिकांची तक्रार आहे. हॉटेलच्या जागेत बदल करून बार सुरू करणे, बारजवळ मोकळ्या जागेत पार्किंग करणे, बारमध्ये रात्री उशिरापर्यंत मोठ्या आवाजात गाणी लावली जाणे अशा प्रकारांमुळे झोप लागत नाही अशी नागरिकांची तक्रार आहे. या परिसरात ‘हिप्पी ॲट हर्ट’ सह इतर काही हॉटेल आहेत.
दरम्यान, तीन ऑगस्ट रोजी महापालिकेने येथील हॉटेल रणजितवर कारवाई केली होती. साइड मार्जिन, व्हरांडा व मागील मोकळ्या जागेतील अनधिकृत बांधकाम पाडण्यात आले. त्यामुळे हॉटेल काही दिवस बंद होते. परंतु कारवाईनंतर पुन्हा बांधकाम करून व्यवसाय सुरू करण्यात आला आहे. हॉटेलच्या मागील मोकळ्या जागेत पुन्हा मोठा तंबू उभारण्यात आला आहे. रात्री उशिरापर्यंत हॉटेल सुरू ठेवल्यामुळे परिसरातील शांतता भंग होत असल्याची तक्रार संघटनेने केली आहे.
---

आमच्या हॉटेलचे पार्किंग असून ग्राहक त्याच ठिकाणी त्यांची वाहने पार्क करतात. आमच्याकडे आलेल्या ग्राहकांचा कोणाला त्रास होवू नये, याची आम्ही काळजी घेतो. हॉटेलच्या रचनेत आम्ही बदल केलेले नाहीत. ठरलेल्या क्षमतेपेक्षा जास्त आवाजात आम्ही स्पीकर लावत नाहीत. कोणत्याही नियमाचा भंग होऊ नये म्हणून आम्ही काळजी घेतो.
- जगदीश चव्हाण, व्यवस्थापक, हिप्पी ॲट हर्ट
-----

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com