महापालिकेच्या १४०० वाहनचालकांना प्रशिक्षण

महापालिकेच्या १४०० वाहनचालकांना प्रशिक्षण

पुणे, ता. २० ः महापालिकेच्या मोटार वाहन विभागातील १४०० चालकांना रविवारी प्रशिक्षण देण्यात आले. तसेच, आरोग्य तपासणीही करण्यात आली. महापालिका आयुक्त विक्रम कुमार व अतिरिक्त आयुक्त कुणाल खेमनार यांनी चालकांना प्रशिक्षण देण्याचा आदेश दिला होता. त्यानुसार गणेश कला क्रीडा रंगमंच येथे प्रशिक्षण आयोजित केले होते. या वेळी प्रभारी प्रादेशिक परिवहन अधिकारी संजीव भोर उपस्थित होते. सेवानिवृत्त सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी अनिल पंतोजी, महापालिकेचे उपायुक्त राजीव नंदकर, मुक्तांगण केंद्राचे अमीर देसाई, अशोक देशमुख यांनी मार्गदर्शन केले. प्रशिक्षणासाठी ऋषिकेश चव्हाण, हितेंद्र कुरणे, गणेश उगले यांनी प्रयत्न केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com