नातं तुझं नि माझं, आनंदी सहजीवनाचं !

नातं तुझं नि माझं, आनंदी सहजीवनाचं !

पुणे, ता. २१ : तनिष्का व्यासपीठ आणि भारती विद्यापीठ न्यू लॉ कॉलेजच्या कौटुंबिक व कायदा सल्ला केंद्रातर्फे ‘नातं तुझं नि माझं, आनंदी सहजीवनाचं !’ या कार्यक्रमाचे येत्या शुक्रवारी (ता. २५) आयोजन करण्यात आले आहे. लग्न ही आयुष्याला वळण देणारी घटना. आयुष्यभर साथ देणारा, समजावून घेणारा जोडीदार मिळावा, असे प्रत्येकालाच वाटते, परंतु जोडीदाराबाबतची स्वप्ने पूर्ण होतातच असे नाही. वेगळ्या वातावरणात राहिलेल्या, स्वभावाच्या, स्वतंत्र व्यक्ती लग्नामुळे एकत्र येतात. लग्नानंतर एकमेकांच्या स्वभावाचे कंगोरे टोचू लागतात. कधीकधी घुसमट होऊन मानसिक त्रास वाढतो किंवा कायद्याचा आधार घेण्यापर्यंत नाते ताणले जाते. त्यातूनच शारीरिक आणि मानसिक आजार वाढतात. असे आयुष्य आपल्या वाट्याला येऊ नये किंवा त्यातून मार्ग कसे काढावेत याविषयीची आनंदी सहजीवनाची सूत्रे या कार्यक्रमात उलगडली जाणार आहेत. वरिष्ठ विवाह समुपदेशक अॅड. स्मिता प्रकाश जोशी, लैंगिक उपचार तज्ज्ञ डॉ. सागर पाठक, मानसोपचार तज्ज्ञ पूर्वा दीक्षित, कायदेतज्ज्ञ अॅड. अभय आपटे उपस्थितांशी संवाद साधणार असून त्यांच्या प्रश्नांना उत्तरेही देणार आहे.
हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला असून त्यासाठी ९७३०८०८६४६ किंवा ८००७२४८८५५ या क्रमांकावर फोन करून नोंदणी करावी. रामबाग कॉलनी (पौड रस्ता) येथील भारती विद्यापीठ न्यू लॉ कॉलेजच्या सभागृहात शुक्रवारी दुपारी साडेतीन वाजता कार्यक्रम होईल. जोडीदारासह यात सहभागी होऊन नाते आनंददायी करावे, असे आवाहन ‘तनिष्का’कडून करण्यात आले आहे.


लग्न करणं आणि ते निभावणं सध्याच्या परिस्थितीत खूपच अवघड झाले आहे. लग्न करताना कोणती काळजी घ्यावी, मानसिक तयारी कशी करावी? नाती कशी समृद्ध करावीत? तसेच काही अडचणी आल्यास कायद्याची मदत कशी आणि केव्हा घ्यावी, हे समजून घेण्याची सध्या आवश्यकता निर्माण झालेली आहे. यासाठी लग्नाळू मुले आणि त्यांचे पालक, विवाहित जोडपी यांना ही कार्यशाळा उपयुक्त ठरेल.
अॅड. स्मिता प्रकाश जोशी, वरिष्ठ विवाह समुपदेशक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com