Thur, June 1, 2023

जंजीरा किल्ल्याचे नाव बदलून ‘छत्रपती दुर्ग’ करण्याची मागणी
जंजीरा किल्ल्याचे नाव बदलून ‘छत्रपती दुर्ग’ करण्याची मागणी
Published on : 27 March 2023, 12:56 pm
पुणे, ता. २७ ः राज्य सरकारद्वारे औरंगाबाद आणि उस्मानाबाद शहराचे नाव बदलून छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिव असे केले आहे. त्याच धरतीवर जंजिरा किल्ल्याचे नाव हे अरबी भाषेतील शब्दकोषातून आले आहे. या किल्ल्याचे नाव बदलून ‘छत्रपती दुर्ग’ असे नाव देण्याची मागणी शिवध्येय प्रतिष्ठानच्या वतीने केली आहे. तसेच या किल्ल्यावर शिवशंभू स्मारक तयार करण्यात यावे, यासाठी राज्य सरकारला निवेदन दिल्याची माहिती प्रतिष्ठानचे योगेश खेंगरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.