‘स्वराज्य पर्व’चे गुरुवारी आयोजन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘स्वराज्य पर्व’चे गुरुवारी आयोजन
‘स्वराज्य पर्व’चे गुरुवारी आयोजन

‘स्वराज्य पर्व’चे गुरुवारी आयोजन

sakal_logo
By

पुणे, ता. २७ ः राष्ट्रकवी रामधारी सिंह ‘दिनकर’ स्मृती न्यास (दिल्ली) तर्फे ‘स्वराज्य पर्व’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त स्वातंत्र्याच्या काळात दिलेल्या योगदान यासाठी लोकमान्य टिळक यांच्या स्मृतींना उजाळा देत ‘लोकमान्य टिळक’ हे नाटक सादर करण्यात येणार आहे. या नाटकाचे लेखन आणि दिग्दर्शन मुजीब खान यांनी केले आहे. टिळक यांचे विचार तळागाळापर्यंत पोचविण्यासाठी संस्थेच्या वतीने प्रयत्न करण्यात येत आहेत. तर हा कार्यक्रम येत्या गुरुवारी (ता. ३०) सायंकाळी पाच वाजता बालगंधर्व रंग मंदिर येथे होणार आहे, अशी माहिती राष्ट्रकवी रामधारी सिंह ‘दिनकर’ स्मृती न्यासचे अध्यक्ष नीरज कुमार यांनी पत्रकार परिषदेत दिली.