
‘आकाश बायजूज’चे नगरमध्ये केंद्र
पुणे, ता. २९ ः एनईईटी, आयआयटी जेईई, ऑलिंपियाड्स कोचिंग आणि फाउंडेशन अभ्यासक्रमाच्या वाढत्या मागणीला प्रतिसाद देत चाचणी तयारी सेवांमध्ये देशात अग्रेसर असलेल्या ‘आकाश बायजूज’ने नगर येथे आपले पहिले क्लासरूम केंद्र उघडले आहे. ‘आकाश बायजूज’ ची २४ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये एकूण ३२५ पेक्षा जास्त केंद्रे आहेत. नगरमध्ये प्रेमदान चौकात गायकवाड ॲव्हेन्यूमध्ये सुमारे सात हजार चौरस फूट जागेत असलेल्या ‘आकाश बायजूज’च्या या केंद्रामध्ये ९ क्लासरूम्स आहेत आणि ५६८ पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना थेट सुविधा देऊ शकतात. या केंद्राचा शुभारंभ ‘आकाश बायजूज’चे प्रादेशिक संचालक अमित सिंग राठोड यांनी कंपनीच्या इतर अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झाला.
‘आकाश बायजूज’चे सीईओ अभिषेक माहेश्वरी म्हणाले, ‘‘आकाश बायजूज’मध्ये आम्ही विद्यार्थी-केंद्रित शिक्षणाचा प्रचार करण्यावर विश्वास ठेवतो. आमच्या विद्यार्थ्यांच्या शिकण्याच्या अनुभवाला आणि त्यांच्या उच्च शिक्षणाची स्वप्ने साकार करण्यासाठी आम्ही वास्तविक आणि आभासी दोन्ही जगातील सर्वोत्तम संधी देत आहोत.’’
‘आकाश बायजूज’चे प्रादेशिक संचालक अमित सिंग राठोड म्हणाले, ‘‘आम्हाला नगरमध्ये पहिले केंद्र उघडताना आनंद होत आहे. शेकडो एनईईटी, जेईई आणि ऑलिंपियाड इच्छुकांना आता योग्य मार्गदर्शन देता येईल. आमच्या सर्व केंद्रांमध्ये प्रशिक्षित शिक्षक, मार्गदर्शक आणि समुपदेशक आहेत. विद्यार्थ्यांना याचा मोठा फायदा होईल.’’