राज्यात १४ ते २२ जून आगमन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राज्यात १४ ते २२ जून आगमन
राज्यात १४ ते २२ जून आगमन

राज्यात १४ ते २२ जून आगमन

sakal_logo
By

पुणे, ता. ८ ः राज्यात साधारणपणे १४ ते २२ जून या कालावधीत मॉन्‍सून मुंबईमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. त्यातही कमी अधिक चार दिवस तफावत अपेक्षित आहे. मुंबईत मॉन्सून आल्यानंतर सह्याद्री ओलांडून तो उर्वरित महाराष्ट्रात प्रवेश करू शकतो, असे हवामानशास्त्र विभागातील निवृत्त हवामानशास्त्रज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी सांगितले.
शुक्रवारी (ता. ९) रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, बीड, धाराशिव, लातूर, अमरावती, वाशीम, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांमध्‍ये पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
दरम्यान, गुरुवारी (ता. ८) वर्धा येथे ४४ अंश सेल्सिअस उच्चांकी तापमानाची नोंद झाली. विदर्भात उन्हाचा चटका कायम असून पारा चाळिशी पार नोंदला जात आहे. मध्‍य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील तुरळक ठिकाणी ४० अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली आहे. त्यात परभणी, जळगाव, सोलापूर, नांदेड या जिल्ह्यांचा समावेश आहे. सध्या पूर्व-मध्य बंगालच्या उपसागरात म्यानमार किनाऱ्यावर तसेच, आंध्र प्रदेशच्या किनाऱ्यालगत चक्राकार वारे वाहत आहेत. यामुळे राज्यात पूर्वमोसमी पावसाला पोषक हवामान होत असून, शुक्‍रवारी (ता. ९) कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार वारे, विजा, मेघगर्जनेसह वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर पुढील चार दिवस कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी वादळी पावसाची शक्यता असल्याचे ही हवामानशास्त्र विभागाने नमूद केले.
दरम्‍यान, आता मॉन्सून देखील केरळात दाखल झाला असून