पत्नीला तोंडी तलाक देणाऱ्या पतीविरुद्ध गुन्हा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पत्नीला तोंडी तलाक 
देणाऱ्या पतीविरुद्ध गुन्हा
पत्नीला तोंडी तलाक देणाऱ्या पतीविरुद्ध गुन्हा

पत्नीला तोंडी तलाक देणाऱ्या पतीविरुद्ध गुन्हा

sakal_logo
By

पुणे, ता. २७ : पत्नीला तोंडी तलाक देणाऱ्या पतीवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. कौटुंबिक हिंसाचार, अपहार, मारहाण करणे, धमकावणे तसेच मुस्लिम महिला कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याचे आदेश लष्कर न्यायालयाचे प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी जे. डी. पाटील यांनी दिले आहेत.

एका विवाहितेने पती अकीब अयुब मुल्ला (वय ३२ रा. कोंढवा) आणि सासरच्यांविरोधात न्यायालयात धाव घेतली होती. डिसेंबर २०१६ मध्ये त्यांचे लग्न झाले आहे. लग्नापूर्वी मुलीच्या सासरच्यांनी त्यांच्याकडे पुरेशी स्थावर मालमत्ता असल्याचे सांगितले होते. मात्र, त्यांच्याकडे मालमत्ता नसल्याचे लग्नानंतर पत्नीला समजले. त्यामुळे तक्रारदार महिला आणि तिच्या मुलीचा खर्चही तिचे आई वडील करत होते. माहेरहून पैसे आणण्यासाठी पती आणि सासरची मंडळी तगादा लावला होता. त्यासाठी महिलेला मारहाण आणि शिवीगाळ केली जात होती. तसेच नोकरी करण्यासाठी महिलेवर दबाव टाकण्यात आला. सासरच्यांनी तिच्या पतीला तलाक देण्यास प्रवृत्त केले. त्यानुसार पती तोंडी तलाक देऊन पसार झाला, असे महिलेने न्यायालयात दाखल केलेल्या तक्रारीत नमूद आहे. पतीने तोंडी तलाक दिल्याने पत्नीने न्यायालयात दाद मागितली होती. न्यायालयाने या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचा आदेश दिला होता. त्यानुसार मुल्ला याच्यासह त्याच्या आई, वडील, बहीण, मेहुण्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुल्ला याला अटक करण्यात आली. दोन दिवसांच्या पोलिस कोठडीनंतर त्याची जामिनावर मुक्तता करण्यात आली.