पोलिस भरतीत बनावट प्रमाणपत्र सादर करणाऱ्याला अटक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पोलिस भरतीत बनावट प्रमाणपत्र सादर करणाऱ्याला अटक
पोलिस भरतीत बनावट प्रमाणपत्र सादर करणाऱ्याला अटक

पोलिस भरतीत बनावट प्रमाणपत्र सादर करणाऱ्याला अटक

sakal_logo
By

पुणे, ता. २७ : पुणे ग्रामीण पोलिस दलाच्या भरती प्रक्रियेत बनावट प्रमाणपत्र सादर करणाऱ्या उमेदवाराला चतु:शृंगी पोलिसांनी अटक केली. बीड येथील तहसील कार्यालयात पोलिसांनी चौकशी केली. तेव्हा बीडमधील तहसील कार्यालयातून वाघमोडेला प्रमाणपत्र दिले नसल्याचे उघड झाले होते. त्यानुसार ही कारवार्इ करण्यात आली.
सचिन भीमराव वाघमोडे (रा. लक्ष्मण टाकळी, ता. पंढरपूर, जि. सोलापूर) असे अटक केलेल्या उमेदवाराचे नाव आहे. याबाबत भिगवण पोलिस ठाण्यातील उपनिरीक्षक विनायक दडस यांनी चतु:शृंगी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. पुणे ग्रामीण पोलिस दलातील भरती प्रक्रिया नुकतीच पार पडली. वाघमोडे याने भरती प्रक्रियेत सुशिक्षित बेरोजगार अंशकालीन (पीटीई) प्रमाणपत्र सादर केले होते. भरती प्रक्रियेत मैदानी आणि लेखी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची गुणवत्ता यादीनुसार निवड करण्यात आली. भरती प्रक्रियेत निवड झालेल्या उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी करण्याचे काम पोलिस उपनिरीक्षक दडस यांच्याकडे सोपविले आहे. निवड झालेला उमेदवार वाघमोडेने सादर केलेले प्रमाणपत्र बनावट असल्याचा संशय आला होता. त्यानंतर बीड येथील तहसील कार्यालयात पोलिसांनी चौकशी केली. तेव्हा बीडमधील तहसील कार्यालयातून वाघमोडेला प्रमाणपत्र दिले नसल्याचे उघड झाले. त्यानंतर वाघमोडेविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली.