Wed, Sept 27, 2023

सावरकर मित्र मंडळ ट्रस्टतर्फे रक्तदान शिबिर
सावरकर मित्र मंडळ ट्रस्टतर्फे रक्तदान शिबिर
Published on : 29 May 2023, 1:23 am
पुणे, ता. २९ ः स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त सावरकर मित्र मंडळ ट्रस्टतर्फे आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात ८० जणांनी रक्तदान केले. या शिबिरात पुणे शहर अमृततृल्य असोसिएशनचे अध्यक्ष अजित व्होरा यांनी ७८ वेळा रक्तदान केल्याबद्दल आमदार माधुरी मिसाळ यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी माजी उपमहापौर सरस्वती शेंडगे, माजी नगरसेवक धीरज घाटे, ट्रस्टचे अध्यक्ष राजाभाऊ शेंडगे आदी उपस्थित होते. सरस्वती शेंडगे यांनी या वेळी पंचविसाव्यांदा रक्तदान केले.