शिक्षण प्रसारक मंडळीच्या अध्यक्षपदी अ‍ॅड. फडके तर उपाध्यक्षपदी पवार

शिक्षण प्रसारक मंडळीच्या अध्यक्षपदी अ‍ॅड. फडके तर उपाध्यक्षपदी पवार

पुणे, ता. १ : शिक्षण प्रसारक मंडळीच्या नुकत्याच झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत संस्थेचे विद्यमान अध्यक्ष अ‍ॅड. सदानंद ऊर्फ नंदू फडके यांची अध्यक्षपदी पुन्हा पुढील ५ वर्षांसाठी तर, उपाध्यक्षपदी गजेंद्र पवार, अनिलकुमार रुईया, डॉ.पवन पोदार यांची नियुक्ती झाली आहे.
सर्वसाधारण सभेचे अध्यक्ष सूर्यकांत पाठक होते. या सभेत शिक्षण प्रसारक मंडळीच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष अ‍ॅड. एस. के. जैन, उपाध्यक्ष श्रीकृष्ण चितळे व इतर नियामक मंडळ सदस्यही उपस्थित होते. अ‍ॅड. जैन, अ‍ॅड. फडके, पवार यांनी मनोगत व्यक्त केले. संस्थेच्या चिटणीस राधिका इनामदार सूत्रसंचालन केले. चितळे यांनी आभार मानले.
अ‍ॅड. नंदू फडके गेली ४२ वर्षे वकिली व्यवसाय करीत आहेत. गजेंद्र पवार हे बांधकाम व्यावसायिक असून पिनॅकल ग्रुपचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक आहेत. याशिवाय मराठी बांधकाम व्यावसायिक संघटना, महाराष्ट्र हौसिंग कॉर्पोरेशन, क्रिकेट मास्टर अ‍ॅकॅडमी यांसारख्या अनेक संस्था व संघटनांवर ते कार्यरत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com