वादळी पावसामुळे झाडे 
उन्मळून पडल्याच्या घटना

वादळी पावसामुळे झाडे उन्मळून पडल्याच्या घटना

पुणे/औंध, ता. १ : पुणे शहरात गुरुवारी सायंकाळी झालेल्या वादळी पावसामुळे औंध, खडकी, बोपोडीसह अन्य परिसरात सुमारे २५ झाडे पडण्याच्या घटना घडल्या. तसेच, येरवड्यातील मेंटल कॉर्नर येथे घरावर झाड पडून घराचे नुकसान झाले.

औंध, खडकी, बोपोडी या परिसरात गुरुवारी सायंकाळी २५ हून अधिक झाडे उन्मळून पडल्याची व हडपसर भागात झाड पडण्याच्या घटनांची अग्निशामक दलाकडे नोंद झाली आहे.
खडकी-औंध रस्त्यावरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात सायंकाळी पावसामुळे पिंपळाचे मोठे झाड कोसळले. त्यामुळे ब्रेमन चौकाकडून खडकी स्टेशनकडे जाणारी वाहतूक पूर्ण बंद करण्यात आली होती. पुणे ग्रामीण पोलिस मुख्यालय आणि चव्हाण नगर येथे वडाच्या झाडाची मोठी फांदी पडून दोन मोटारींचे नुकसान झाले. या घटनेत कोणी जखमी झालेले नाही. काही भागात रस्त्यांवर झाडे पडल्यामुळे वाहतूक कोंडी झाली होती. अग्निशामक दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत रस्त्यावर पडलेली झाडे रस्त्यातून बाजूला करून वाहतुकीस होणारा अडथळा दूर केला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com