
महापालिका प्रशासनाकडून नालेसफाईला वेग, नागरीकांच्या तक्रारींची दखल घेत सफाईला प्राधान्य महापालिका प्रशासनाकडून नालेसफाईला वेग, नागरीकांच्या तक्रारींची दखल घेत सफाईला प्राधान्य
नाल्यांत वस्तू टाकू नका
पालिकेचे नागरिकांना आवाहन
पुणे, ता. २ ः पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयांतर्गत नालेसफाईला वेग दिला जात आहे; मात्र प्लॅस्टिकच्या बाटल्या, गाद्या, कपडे यांसारख्या वस्तु मोठ्या प्रमाणात अडकल्याने नाले तुंबण्याचे प्रकार घडत आहेत. त्यामुळे नागरीकांनी अशा वस्तु नाल्यांमध्ये टाकू नयेत, असे आवाहन महापालिकेने केले आहे.
महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त महेश पाटील यांनी सांगितले की, पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर आमचा विभाग सक्रिय झाला आहे. नालेसफाईकडे गांभीर्याने लक्ष दिले जात असून कामांवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. नागरिकांकडून कचरा थेट नाल्यांत जात आहे. हा कचरा काढण्याचे काम केले जात आहे. अनेक ठिकाणी कामे केली आहे. काही ठिकाणे राहिली आहेत. तेथेही आता सफाईची कामे केली जात आहेत. गणेश पेठेत थर्माकोल, फोम जमा करण्यासाठी वेगळी जागा देण्यात आली असूनही अशा वस्तू फेकल्या जात आहेत.
सहायक आयुक्त व आपत्ती व्यवस्थापन अधिकारी गणेश सोनुने यांनी सांगितले की, नागरीकांना नालेसफाई संदर्भात तक्रारी पाठविण्याचे आवाहन प्रशासनाने केले होते. त्यानुसार ४८ तक्रारी प्राप्त झाल्या. याची दखल घेऊन त्या सोडविण्यासाठी प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयात २५ कर्मचारी, एक जेसीबी व अन्य यंत्रणा तयार ठेवण्यात आली आहे. त्याद्वारे नालेसफाई, पाणी तुंबण्याची ठिकाणे अशा विविध ठिकाणी कामे केली जात आहेत.
---
‘पीएमआरडीए''चे पथक
‘पीएमआरडीए''नेही आपत्ती व्यवस्थापनासाठी विशेष पथक तयार केले आहे. त्यांच्याकडूनही नालेसफाईवर भर दिला जात आहे. पावसाळ्यापूर्वीची कामे त्यांच्याकडून केली जात आहेत.
---
तक्रारीसाठी क्रमांक
नालेसफाई, पावसाळी लाईन/चेंबरची कामे झाली नसल्यास इथे लेखी तक्रार करावी.
महेश पाटील ः ९६८९९३०५३१, गणेश सोनुने ः ९६८९९३५४६२
-----