‘पीएमपी’चे १० मार्ग 
आजपासून पूर्ववत होणार

‘पीएमपी’चे १० मार्ग आजपासून पूर्ववत होणार

पुणे, ता. १४ ः मुळशी तालुक्यातील विविध गावांतील ‘पीएमपी’च्या दहा मार्गांवरील बससेवा गुरुवारपासून (ता. १५) स्वारगेट, मार्केट यार्ड येथून पूर्ववत करण्याचा निर्णय पीएमपी प्रशासनाने घेतला आहे.

ही बससेवा पूर्वीपासून सुरू होती. मात्र, मधल्या काळात पीएमपीने लांब अंतराच्या काही बस बंद केल्या होत्या. त्यात या मार्गांवरील सेवाही खंडित करण्यात आली होती, परंतु या मार्गांना चांगला प्रतिसाद मिळत असल्यामुळे ही सेवा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय पीएमपी प्रशासनाने घेतला आहे.

पूर्ववत होणारे मार्ग
- मार्ग क्र. ६९- मार्केट यार्ड ते घोटावडे गाव (मार्गे- मुगावडे, स्वारगेट, डेक्कन कॉर्नर, कोथरूड डेपो)
- मार्ग क्र. ७० - मार्केट यार्ड ते मालेगाव (शेडाणी फाटा) (मार्गे - स्वारगेट, कोथरूड डेपो, पौडगाव, मालेगाव)
- मार्ग क्र. २२७ - मार्केट यार्ड ते उरावडेगाव (मारणेवाडी) (मार्गे - कोथरूड डेपो, भूगाव, उरावडेगाव)
- मार्ग क्र. २२७ अ - मार्केट यार्ड ते खारावडे (लव्हार्डेगाव) (मार्गे- पिरंगुट, उरावडेगाव, मुठा)
- मार्ग क्र. २३१ - स्वारगेट ते काशिंगगाव कमान (मार्गे - डेक्कन कॉर्नर, पौडगाव, कोळवणगाव)
- मार्ग क्र. २३२ - स्वारगेट ते बेलावडे (मार्गे - कोथरूड डेपो, पौडगाव, कोंढावळे)
- मार्ग क्र. २३३- मार्केट यार्ड ते पौडगाव शासकीय वसतिगृह (मार्गे- स्वारगेट, कोथरूड डेपो, भूगाव, घोटावडे फाटा)
- मार्ग क्र.२३३ अ - मार्केट यार्ड ते कोळवणगांव (मार्गे - स्वारगेट, कोथरूड डेपो, दारवली, डोंगरगाव)
- मार्ग क्र.२३३ ब - स्वारगेट ते भादसगाव (मार्गे - स्वारगेट, कोथरूड डेपो, भूगाव, पौडगाव, रावडेवाडी)
- मार्ग क्र.२७९ - मार्केट यार्ड ते खांबोली (कातरखडक) (मार्गे - कोथरूड डेपो, पिरंगुट, रिहेफाटा, खांबोली)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com