पुरग्रस्त कुटुंबीयांच्या पुनर्वसनाचा प्रश्‍न मार्गी

पुरग्रस्त कुटुंबीयांच्या पुनर्वसनाचा प्रश्‍न मार्गी

पुणे, ता. १८ : राजेंद्रनगर येथील पुनर्वसनासाठी अनेक वर्षे लढा देणाऱ्या २७ पूरग्रस्त कुटुंबीयांच्या पुनर्वसनाचा प्रश्‍न अखेर मार्गी लागला आहे. पुणे जिल्हा कामगार संघटना, काँग्रेस पक्षाच्यावतीने महापालिका आयुक्त व झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून पूरग्रस्तांचे ‘एसआरए’ प्रकल्पात पुनर्वसन करण्याचे आश्‍वासन प्रशासनाकडून दिल्याची माहिती काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी यांनी दिली.
राजेंद्रनगर येथील १००४/५ या ठिकाणी राहणारे २७ पूरग्रस्त कुटुंबीयांचे पुनर्वसन अनेक वर्षांपासून रेंगाळले होते. संबंधित वस्तीतील काही कुटुंबीयांचे २००७ ते २०१३ दरम्यान पुनर्वसन झाले. तर उर्वरित २७ कुटुंबांचे पुनर्वसन झाले नव्हते. त्यांची दखल घेतली जात नव्हती. दरम्यान काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी, आमदार रवींद्र धंगेकर, पुणे जिल्हा कामगार संघटनेच्या अध्यक्षा किरण मोघे, सचिव रेखा कांबळे यांची महापालिका आयुक्त विक्रम कुमार, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी नीलेश गटणे यांच्यासमवेत बैठक झाली. त्यामध्ये संबंधित कुटुंबांना ‘एसआरए’च्या ट्रान्झिट कॅम्पमध्ये हलविले जाईल, त्यांची महापालिकेच्या विभागीय कार्यालयाकडून पात्रता पाहिली जाईल. त्यानंतर त्याच परिसरात नव्याने उभ्या राहणाऱ्या ‘एसआरए’ इमारतीमध्ये त्यांचे पुनर्वसन करण्यात येईल, असे आश्‍वासन देण्यात आले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com