सहा रेल्वे गाड्यांना अतिरिक्त डबे

सहा रेल्वे गाड्यांना अतिरिक्त डबे

Published on

पुणे, ता. १८ ः रेल्वे प्रशासनाने वाढती गर्दी लक्षात घेता सहा रेल्वे गाड्यांचे डबे वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. वाढविण्यात आलेल्या डब्यांमध्ये द्वितीयश्रेणी शयनयान व वातानुकूलित तृतीय श्रेणीचा समावेश आहे. सहा गाड्यांचे डबे वाढल्याने सुमारे १७४४ प्रवाशांना दररोज आरक्षित तिकीट उपलब्ध होणार आहे. त्यामुळे प्रवाशांची चांगली सोय झाली आहे. रेल्वे प्रशासनाने डब्यांची संख्या वाढविताना केवळ एसीचे डबे न वाढविता द्वितीय श्रेणीचेही डबे वाढविल्याने सामान्य प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.

या गाड्यांचे वाढले डबे
- कलबुर्गी - कोल्हापूर - कलबुर्गी एक्स्प्रेस (गाडी क्रमांक - २२१५५-२२१५६) - २६ जूनपासून या गाडीला दोन एसी व तीन स्लीपरचे अतिरिक्त डबे
- नागपूर- कोल्हापूर- नागपूर (गाडी क्रमांक - ११४०४- ११४०३ ) २० जूनपासून एक एसी थ्रीचा अतिरिक्त डबा
- हजरत निजामुद्दीन - कोल्हापूर - हजरत निजामुद्दीन एक्स्प्रेस (गाडी क्रमांक १२१४७-१२१४८) २० जूनपासून एक थ्री एसी व स्लीपरचे दोन अतिरिक्त डबे
- अहमदाबाद - कोल्हापूर - अहमदाबाद एक्स्प्रेस (गाडी क्रमांक ११०५० - ११०४९) २५ जूनपासून एक थ्री एसी व दोन स्लीपर अतिरिक्त डबे
- दादर - साईनगर शिर्डी - दादर एक्स्प्रेस (गाडी क्रमांक ११०४१- ११०४२) २० जूनपासून एक थ्री एसीचा अतिरिक्त डबा
- दादर - पंढरपूर - दादर एक्स्प्रेस (गाडी क्रमांक ११०२७ - ११०२८) १९ जूनपासून या गाडीला एक थ्री एसीचा अतिरिक्त डबा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.