‘ससून’च्या बाह्यरुग्ण
विभागाचे नूतनीकरण

‘ससून’च्या बाह्यरुग्ण विभागाचे नूतनीकरण

Published on

पुणे ः ससून रुग्णालयाच्या बाह्यरुग्ण विभागाचे नूतनीकरण सुरू करण्यात आले असून, त्याची सुरुवात बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आला. या वेळी उपअधिष्ठाता डॉ. नरेश झंझाड, वैद्यकीय अधिक्षक डॉ. यल्लपा जाधव, उपवैद्यकीय अधिक्षक डॉ. सुनील भामरे उपस्थित होते. ससून रुग्णालयात रुग्ण मोठ्या संख्येने उपचार घेण्यासाठी येतात. याच भागात विविध आजारावर उपचार देणारे बाह्यरुग्ण विभाग आहेत. त्यामुळे येथे गर्दी होते. येथील रुग्णसेवा सुरळीत व्हावी, यासाठी बाह्यरुग्ण विभागाचे नूतनीकरण करण्यात येणार आहे. या कामामुळे अस्थिरोग विभागाचे बाह्यरुग्ण विभाग तात्पुरत्या स्वरूपात रुग्णालयाच्या नवीन अकरा मजली इमारतीमध्ये स्थलांतरित करण्यात आला आहे., अशी माहिती रुग्णालयातर्फे देण्यात आली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.