बालकलाकारांनी साकारली स्वातंत्र्याची अमृतगाथा

बालकलाकारांनी साकारली स्वातंत्र्याची अमृतगाथा

पुणे, ता. १८ ः ‘वेदमंत्राहून आम्हा वंद्य वंदे मातरम्’, ‘हे राष्ट्र देवतांचे’, ‘कंधो से मिलते है कंधे’, ‘हम करे राष्ट्र आराधन’ अशा देशभक्तिपर गीतांतून बाल-कुमार वयोगटातील मुलांनी देशाच्या स्वातंत्र्याची अमृतगाथा उलगडली.
निमित्त होते, स्वरमयी गुरुकुल येथे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आयोजित ‘अभिवादन भारतीय स्वातंत्र्याला’ या कार्यक्रमाचे.
गायन, वादन व निवेदन सारे काही लहान मुलांचेच असलेल्या या कार्यक्रमाला रसिकांची दाद तर मिळालीच, पण ज्येष्ठ गायिका स्वरयोगिनी डॉ. प्रभा अत्रे यांनीही मुलांचे कौतुक केले. याप्रसंगी स्वरमयी गुरुकुलचे कार्यक्रम निर्देशक प्रसाद भडसावळे, डॉ. प्रभा अत्रे फाउंडेशनच्या सचिव डॉ. भारती एमडी., चित्रा देशपांडे, प्राची पंडित नामजोशी, मुग्धा बारहाते, सुप्रिया चित्राव आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाची निर्मिती संकल्पना ‘आकार’ संस्थेच्या चित्रा देशपांडे, सुखदा खांडकेकर यांची होती. तर कार्यक्रमात स्वरोम बारहाते, अमेय देसाई, यज्ञेश वाखरकर, सई जोशी, आरोही देशपांडे, हर्षिता कुंभारकर, ज्ञानदा पाठक, सौम्या फडके, संहिता फडके, प्रजुषा हुद्दार, सनत देशपांडे, सुनंदन देशपांडे, प्रणव कुलकर्णी, मृण्मयी गंधे, मधुश्री हजरनवीस, शताक्षी कन्नडकर, राघव शेंडे, उर्वी गोखले, पियुष बाणेकर, सर्वज्ञ मते, यशिका मते ही मुले सहभागी झाली होती.
-----

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com