मोर्चा घोषणांनी दुमदुमला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मोर्चा घोषणांनी दुमदुमला
मोर्चा घोषणांनी दुमदुमला

मोर्चा घोषणांनी दुमदुमला

sakal_logo
By

पुणे, ता. २२ ः तरुणाईचा उत्साह, हातात भगवे झेंडे तर गळ्यात भगवे उपरणे आणि डोक्यावर टोपी. टाळ मृदंगांच्या गजरात जय श्री राम, छत्रपती शिवाजी महाराज की जय आदी घोषणांनी परिसर दुमदुमला होता. निमित्त होते हिंदू जनआक्रोश मोर्चाचे. लाल महाल ते संभाजी पुतळ्यादरम्यान निघालेल्या या मोर्चात महिलांचाही सहभाग लक्षणीय होता.

धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराजांचा बलिदान दिन हा धर्मवीर दिन म्हणून घोषित करावा. गोहत्या, लव्ह जिहाद व धर्मांतर विरोधी कायदा राज्यांसह देशांत लागू करण्यात यावा, या मागण्यांच्या पूर्ततेसाठी सकल हिंदू समाजतर्फे हिंदू जनआक्रोश मोर्चाचे रविवारी सकाळी आयोजन करण्यात आले होते. लाल महाल येथून मोर्चाला सकाळी सव्वा अकराच्या सुमारास सुरूवात झाली. मोर्चाच्या अग्रभागी भगवा ध्वज होता. संभाजी महाराज यांचा पुतळा रथात ठेवण्यात आला होता. त्यासोबत भगव्या रंगाच्या साडी नेसलेल्या व गळ्यात उपरणे असलेल्या महिला होत्या.

श्रीरामाचे तैलचित्र, हातात टाळ व मृदंग घेऊन सहभागी झालेले वारकरी, महिला व तरुणीची लक्षणीय उपस्थिती होती. लाल महालापासून सुरू झालेला मोर्चा पुढे सरकत राहिला. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात आमदार छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते आरती करण्यात आली. यानंतर मोर्चा बेलबाग चौकातून लक्ष्मी रस्त्यावरून निघाला. मोर्चाच्या स्वागतासाठी रस्त्यावर कमानी उभारण्यात आल्या होत्या. काही सामाजिक संघटनांनी मोफत पाण्याचे बाटल्यांचे वाटप केले. लक्ष्मी रस्त्यावरून मोर्चा टिळक चौक, लकडी पुलावरून खंडोजी बाबा चौक येथून डेक्कन येथील सभास्थळी मोर्चाचे रूपांतर सभेत झाले. मोर्चात अनेक आजी-माजी लोकप्रतिनिधी, कार्यकर्ते सहभागी झाले होते.

पोलिसांचा बंदोबस्त
गो हत्या बंद करा, बेटी बचाव भारत बचाव, एकच वीर धर्मवीर, छत्रपती शिवाजी महाराज की जय, संभाजी महाराज की जय, जय श्रीराम आदी घोषणा मोर्चात देण्यात आल्या. मोर्चा पाहण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. या वेळी पोलिस बंदोबस्त कटेकोट होता.

PNE23T20026,PNE23T20032,PNE23T20033