विद्यापीठाच्या शिक्षकेतर सेवक निबंधलेखन स्पर्धेचा निकाल जाहीर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विद्यापीठाच्या शिक्षकेतर सेवक निबंधलेखन स्पर्धेचा निकाल जाहीर
विद्यापीठाच्या शिक्षकेतर सेवक निबंधलेखन स्पर्धेचा निकाल जाहीर

विद्यापीठाच्या शिक्षकेतर सेवक निबंधलेखन स्पर्धेचा निकाल जाहीर

sakal_logo
By

पुणे, ता. २३ : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या बहि:शाल शिक्षण मंडळ आणि ज्येष्ठ नागरिक सहाय्यता कक्षामार्फत शिक्षकेतर सेवकांसाठी घेतलेल्या निबंधलेखन स्पर्धा आणि चर्चा परिसंवाद संघ स्पर्धांचा निकाल जाहीर केला आहे.
शिक्षकेतर सेवकांसाठी झालेल्या निबंधलेखन स्पर्धेत विद्यापीठाच्या कायदा व तक्रार निवारण कक्षाचे उमेश कोळी यांनी प्रथम क्रमांक पटकाविला आहे. या स्पर्धेत जयकर ज्ञानस्त्रोत केंद्राच्या वृषाली खिलारी यांनी द्वितीय, तर वित्त व लेखा विभागाच्या वंदना जोशी यांनी तृतीय क्रमांक मिळविला आहे. मानवशास्त्र विभागातील गौरी गुरव आणि वित्त व लेखा विभागातील हेमलता पाटील यांना उत्तेजनार्थ क्रमांक विभागून देण्यात आला. तसेच शिक्षकेतर सेवकांसाठी चर्चा परिसंवाद संघ स्पर्धादेखील घेण्यात आल्या. या स्पर्धेतील विजेत्यांची नावे जाहीर केल्याची माहिती बहि:शाल शिक्षण मंडळाचे मानद संचालक डॉ. हरिश्चंद्र नवले यांनी दिली.