अली सय्यद यांना पुरस्कार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अली सय्यद यांना पुरस्कार
अली सय्यद यांना पुरस्कार

अली सय्यद यांना पुरस्कार

sakal_logo
By

पुणे, ता. २१ : कराटे प्रशिक्षक अली सय्यद यांना ‘रूस्तम ए हिंद कै. हरिशचंद्र बिराजदार’ प्रशिक्षक पुरस्काराने नुकतेच गौरविण्यात आले. भवानी पेठेतील जनरल अरुण कुमार वैद्य स्टेडियम येथे जिल्हास्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धा नुकतीच झाली. लहूजी कराटे क्लबमध्ये मुलांना कराटे स्पर्धेत राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील प्रशिक्षण दिल्याने अली सय्यद यांना गौरविण्यात आले. या प्रसंगी हिंदकेसरी अभिजित कटके, माजी आमदार रमेश बागवे, मोहन जोशी तसेच रोहित टिळक, अविनाश बागवे, सागर बिराजदार, राहुल बिराजदार आदी उपस्थित होते.