ईव्हीएम मशिन तपासणीचे काम सुरु | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ईव्हीएम मशिन तपासणीचे काम सुरु
ईव्हीएम मशिन तपासणीचे काम सुरु

ईव्हीएम मशिन तपासणीचे काम सुरु

sakal_logo
By

पुणे, ता. २३ : कसबा पेठ आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीची पूर्वतयारी जिल्हा प्रशासनाने सुरु केली आहे. या निवडणुकीच्या मतदानासाठी जिल्हा प्रशासनाला एक हजार ७२० ईव्हीएम मशिन मिळाल्या असून त्यांच्या प्राथमिक तपासणीचे काम सुरु केल्याची माहिती जिल्हा निवडणूक शाखेने दिली.
कसबा पेठ विधानसभा मतदारसंघाच्या आमदार मुक्ता टिळक आणि चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या दोन विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीचा कार्यक्रम केंद्रीय निवडणूक आयोगाने नुकताच जाहीर केला आहे. दरम्यान, उमेदवारी यादी अंतिम झाल्यानंतर पुन्हा एकदा सर्व राजकीय प्रतिनिधींसमवेत ईव्हीएम मशिनची तपासणी केली जाणार असल्याची माहिती निवडणूक शाखेच्या उपजिल्हाधिकारी आरती भोसले यांनी दिली.

मतदारसंघ मतदार केंद्र
कसबा पेठ - २,७५,४२८ २७०
चिंचवड - ५,६६,४१५ ५१०

३१ जानेवारीपासून
- उमेदवारी अर्ज भरण्यास सुरवात

२७ फेब्रुवारी
- प्रत्यक्ष मतदान

२ मार्च
- मतमोजणी