अवती भवती

अवती भवती
Published on

‘२४ कॅरेट गोल्ड साँग’
मैफिलीला प्रतिसाद

पुणे, ता. २९ : डॉ. जोहरभाई चुनावाल, रोटरी क्लब पुणे कॅम्प आणि डिस्ट्रिक्ट ३१३१ यांच्या वतीने ‘२४ कॅरेट गोल्ड साँग ऑफ आर. डी बर्मन’ या आयोजित केलेल्या संगीत मैफिलीला रसिक प्रेक्षकांनी प्रतिसाद दिला. पोलिओग्रस्तांच्या मदतीसाठी हा कार्यक्रम घेण्यात आला होता. यावेळी हिंदी चित्रपटातील अजरामर गीते सादर करण्यात आली. या कार्यक्रमाला रोटरी क्लबचे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर शीतल शहा आणि सौंदर्यवती ऐश्वर्या दवले प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होत्या. याप्रसंगी विविध गायकांना ‘पुणे आयडॉल’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमात गायक हिम्मतकुमार पांडिया, राजेश्वरी पवार, डॉ. संजीव तांदळे, मोनाली दुबे, आकाश सोळंकी आणि संदीप पंचवटकर यांनी साथसंगत केली.
.....
मालन गायकवाड यांची
उपाध्यक्षपदी निवड
पुणे, ता. २९ : भारतीय बुद्ध सासन सभा महिला आघाडीच्या उपाध्यक्षपदी मालन गायकवाड यांची नियुक्ती करण्यात आली. यावेळी अॅड. एल. टी. सावंत, के. व्ही. सोनकांबळे, श्याम डिंगळे, एच. बी. जाधव, अरुण कांबळे, छाया जाधव आदी उपस्थित होते.
-----------------------
तळेगाव दाभाडेत
पुरस्कार सोहळा
पुणे, ता. २९ : भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून तळेगाव दाभाडे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान येथे राष्ट्रीय संविधान प्रचारक व रक्षक पुरस्कार सोहळा आयोजित केला होता. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जिले सिंह, अॅड. रंजना भोसले, यशवंत मानखेडकर, मिलिंद पानपाटील, मिलिंद शेलार आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या निमित्ताने या निवासस्थानास ‘संविधान भूमी’ असे नामकरण करण्यात आले. त्यानंतर कला, साहित्य, विज्ञान तंत्रज्ञान, सामाजिक शैक्षणिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य केलेल्या ७५ व्यक्तींचा सन्मान करण्यात आला. जिले सिंह म्हणाले, ‘‘देशाच्या सीमेवर आणि देशाची अंतर्गत सुरक्षा करणारी सर्व सुरक्षा बले जशी आपल्याला सुरक्षा प्रदान करतात, त्याचप्रमाणे आपला राष्ट्रीय ग्रंथ संविधान आपली नेहमी सुरक्षा करतो.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com