ऐेसा चोपदार होणे नाही …

ऐेसा चोपदार होणे नाही …

लोगो----------प्रासंगिक

फोटो-----29377

ऐेसा चोपदार होणे नाही!

ऐेसा चोपदार होणे नाही !

शिक्षण व वारीतील समाजप्रबोधनकार, माझे पितृतुल्य सासरे कै. कृष्णराव वासुदेव रंधवे-चोपदार गुरुजी. पालखी सोहळ्यामुळे चोपदार गुरुजी यांची आठवण महाराष्ट्रातील सर्वसामान्य वारकरी, फडकरी, प्रशासकीय अधिकारी, पत्रकार यांना येतेच. त्यांचे अस्तित्व आजही आमच्या अवतीभवती असते.
चोपदार गुरुजी हे संत ज्ञानेश्वर महाराजांचे वंशपरंपरागत ‘चोपदार’ होते. तो वारसा त्यांचे दोन सुपुत्र चालवत आहेत. माउलींच्या वारीत नित्यक्रम करीत आहेत. संपूर्ण महाराष्ट्रच नव्हे तर भारताच्या काही भागांतही ‘चोपदार गुरुजी माहीत होते. ‘आदर्श वारकरी’ कसा असावा हे त्यांच्याकडे पाहून समजत होता. त्यांनी उदरनिर्वाहासाठी शिक्षकाची नोकरी केली पण त्यापेक्षा ते ‘समाजशिक्षक’च मोठे होते. त्यांनी हजारो विद्यार्थी व वारकरी घडविण्याचे मोठे कार्य केले आहे.
माउलींचे चोपदार म्हणून त्यांनी केलेले कार्य कोणीच विसरू शकणार नाही. किती तरी नवीन गोष्टी, प्रथा, परंपरा त्यांनी सुरू केल्या. त्यांची तळमळ व त्याग आणि तडप खूप मोठी होती. त्यांनी ज्या कल्पना मांडलेल्या होत्या, त्या आजही चालू आहेत. ते वेगवेगळ्या संस्थांनी आज उपक्रम म्हणून जागोजागी केलेले दिसते. त्याचा कृतीवर भर होता व वारकऱ्यांच्या खऱ्या गरजा ओळखणारे एकमेव व्यक्ती ते होते. वारीत त्यांनी जे-जे सुरू केले ते अभूतपूर्व होते व त्याचे मोल आज कळते. काळाच्या ओघात बदल झाला. आज गरज भासत नाही पण काळाचा महिमा व गरज त्याकाळी महत्त्वाचीच होती. ज्यांनी-ज्यांनी त्याचा लाभ घेतला तेच हे जाणू शकतात. यात्रेच्या काळात (मोबाईल नव्हते) आपल्या घरी पत्र पाठविणे, घरून पत्र येणे, खुशाली कळवणे-कळणे यासाठी फक्त पत्र हेच माध्यम होते, हे गुरुजींनी ओळखले. पोस्ट विभागाला संपर्क केला व फिरती पोस्टपेटी मिळवली. एका ट्रकला लावली. वारकऱ्यांची सोय झाली. यापुढे जाऊन गुरुजी स्वतः वेगवेगळ्या दिंडीच्या ठिकाणी ज्याची पत्र त्याला देत होते. हे अनोखे नाही काय? चुकलेला वारकरी त्यांच्या मुक्कामी पोहोचण्यासाठी त्यांनी ‘सकाळ’च्या मदतीने ‘चला देवाचिया गावा’ हा उपक्रम सुरू केला. आजही तो चालू आहे. शैलजाने लहानपणी सर्व दिंड्यांची यादी, त्यांची कीर्तने, जागर या सर्व माहितीची नोंद स्वहस्ते लिहिली. वारीत वर्तमानपत्र उपलब्ध व्हावा, याचे नियोजन त्यांनी अनेक वर्ष केले.
चोपदार गुरुजी शिस्तप्रिय होते. वारकऱ्यांना सोयी व सुविधा उपलब्ध व्हाव्यात म्हणून ते आग्रही असत. प्रसंगी चांगल्यासाठी प्रशासन, पोलिस, आळंदी संस्थान, ग्रामस्थ, वारकरी यांची नाराजी घेत पण ते त्यांना हवे तसे योग्य करीत. वारीत जे पोलिस करू शकत नव्हते ते गुरुजी एकटे करू शकत होते.
मी चोपदार गुरुजींना समाजसेवक, कार्यकर्ता असे म्हणत नाही कारण जीवनाकडे पाहताना समाजाचा विचार करणारा, समाजासाठी काम करणारा, समाजातील तळागाळातील सामान्य माणसाच्या उपयोगी पडणारा, स्वतःहून मदतीचा हात पुढे करणारा, आयुष्यभर वारकऱ्यांची व माउलींची सेवा करणारा, सतत समाजाचे चांगला चिंतणारा असा हा ‘समाजकर्ता’ पुरुष म्हणून ते मोठे वाटतात. कै. कृष्णाजी वासुदेव रंधवे ऊर्फ बाबूराव चोपदार गुरुजी पुन्हा होणे नाहीच.
- ज्ञानेश्वर मोळक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com