पुरवणी परीक्षेचे प्रवेशपत्र मिळणार उद्यापासून

पुरवणी परीक्षेचे प्रवेशपत्र मिळणार उद्यापासून

पुणे, ता. २ : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या दहावी-बारावीच्या पुरवणी परीक्षेची प्रवेशपत्रे (हॉलतिकिट) गुरुवारपासून (ता. ४) ‘www.mahahsscboard.in’ या संकेतस्थळावर उपलब्ध होणार आहेत. सर्व माध्यमिक शाळा, उच्च माध्यमिक शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालये यांनी प्रवेशपत्राची छायांकित प्रत काढून विद्यार्थ्यांनी द्यावी, अशी सूचना राज्य मंडळाने दिली आहे.
राज्य मंडळातर्फे जुलै-ऑगस्टमध्ये दहावी-बारावीची पुरवणी परीक्षा घेण्यात येत आहे. या परीक्षेसाठी सर्व विभागीय मंडळातील विद्याथ्यांना ऑनलाइन प्रवेशपत्र उपलब्ध करून दिली जाणार आहेत. गुरुवारपासून शाळा/महाविद्यालयांच्या लॉगिनमध्ये विद्यार्थ्यांनी प्रवेशपत्रे उपलब्ध असतील, ती डाऊनलोड करून विद्यार्थ्यांना छायांकित प्रत देण्यात यावी. दरम्यान, काही तांत्रिक अडचण उद्‌भवल्यास माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांनी विभागीय मंडळाकडे संपर्क साधावा, असे राज्य मंडळाने स्पष्ट केले आहे.
प्रवेशपत्र ऑनलाइन पद्धतीने प्रिटींग करताना विद्यार्थ्यांकडून त्यासाठी कोणतेही वेगळे शुल्क घेऊ नये. या प्रवेशपत्राची प्रिंट काढून त्यावर मुख्याध्यापकांचा/प्राचार्यांचा शिक्का उमटवून स्वाक्षरी करावी. प्रवेशपत्रात विषय आणि माध्यम बदल असतील तर त्यांच्या दुरुस्त्या माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांनी विभागीय मंडळात समक्ष जाऊन करून घ्याव्यात. प्रवेशपत्रावरील छायाचित्र, स्वाक्षरी, विद्यार्थ्याचे नाव या संदर्भातील दुरुस्त्या माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांनी त्यांच्या स्तरावर करून त्यांची एक प्रत विभागीय मंडळाकडे त्वरित पाठवावी. विद्यार्थ्यांकडून प्रवेशपत्र गहाळ झाल्यास संबंधित माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांनी पुन्हा प्रिंट काढून त्यावर लाल शाईने द्वितीय प्रत असा शेरा देऊन विद्यार्थ्यांस प्रवेशपत्र द्यावे. छायाचित्र सदोष असल्यास त्यावर विद्यार्थ्यांचे छायाचित्र चिकटवून त्यावर संबंधित मुख्याध्यापक/प्राचार्य यांनी शिक्का उमटवून स्वाक्षरी करावी, अशी सूचना राज्य मंडळाचे प्रभारी सचिव शैलेंद्र पाटील यांनी दिली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com