हडपसरवासीयांकडून रांगोळ्यांच्या पायघड्या

हडपसरवासीयांकडून रांगोळ्यांच्या पायघड्या

Published on

हडपसर, ता. २ :
काळाचे ही काळ । आम्ही विठोबाचे लडिवाळ ॥
करूं सत्ता सर्वां ठायी । वसों निकटवासें पायीं ॥
असा आत्मसन्मानी उत्साही भाव आणि अबीर केशरी टिळा माथ्यावर मिरवत आलेल्या वैष्णव मेळ्याचे मंगळवारी (ता. २) हडपसरवासीयांनी उत्साहात स्वागत केले. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज व जगद्‍गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळा पुण्यातील दोन दिवसांचा मुक्काम संपवून हडपसरमध्ये दाखल झाला. सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांचा, तर दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास जगद्‍गुरु श्री संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा गाडीतळ येथील विसावास्थळी विसावला. हरिनामाचा जयघोष, टाळ-मृदंगाचा नाद आणि रांगोळ्यांच्या पायघड्यांनी हडपसरकरांनी सोहळ्याचे उत्साहात स्वागत केले.
दोन्ही संतांच्या पालखी सोहळ्याचे स्वागत आमदार चेतन तुपे पाटील, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर, महापालिका आयुक्त राजेंद्र भोसले, शिवसेना शहरप्रमुख प्रमोद भानगिरे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, माजी आमदार महादेव बाबर यांनी केले. सहाय्यक महापालिका आयुक्त बाळासाहेब ढवळे पाटील, पोलिस उपायुक्त आर. राजा, सहाय्यक पोलिस आयुक्त अश्विनी राख, वरिष्ठ पोलिस निरीक्षक संतोष पांढरे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख उल्हास तुपे, माजी नगरसेवक योगेश ससाणे, सुनील बनकर, विजय देशमुख, पल्लवी सुरसे, डॉ. शंतनू जगदाळे, संदीप बधे, सुभाष जंगले, ऊर्मिला आरू, पोलिस ठाण्याचे गोपनीय विभागप्रमुख दिनेश शिंदे आदी या वेळी उपस्थित होते. काळुराम तुपे व कमल बोरकर यांच्या श्री गुरूदत्त महिला भजनी मंडळाने संत तुकाराम महाराज विसावास्थळी भजनसेवा दिली.
दरम्यान, पालखी सोहळ्याच्या दर्शनासाठी हडपसर परिसरासह पूर्व भागातील वाघोली, मांजरी खुर्द, मांजरी बुद्रुक, आव्हाळेवाडी, केसनंद, कोलवडी, चंदननगर, खराडी, मुंढवा, केशवनगर, साडेसतरानळी, कोंढवा, महंमदवाडी, ससाणेनगर, उंड्री, पिसोळी, औताडेवाडी, हांडेवाडी, वडाचीवाडी, होळकरवाडी आदी भागातील नागरिक मोठ्याप्रमाणात आले होते. शहर व परिसरातील अनेक भाविक निरोप देण्यासाठी सोहळ्यात सहभागी झाले होते.

विविध संस्थांकडून सेवा
पालखी सोहळ्यासाठी पालिकेचे सुमारे नऊशे, तर पोलिस प्रशासनातील सुमारे सहाशे अधिकारी व कर्मचारी, तसेच विविध मंडळांचे स्वयंसेवक, अण्णासाहेब मगर महाविद्यालय, जेएसपीएम विधी महाविद्यालय, एस. एम. जोशी महाविद्यालयातील विद्यार्थी स्वयंसेवक म्हणून सहभागी झाले होते. विजय मोरे यांनी आठ रुग्णवाहिकांची व्यवस्था केली होती. सिरम कंपनीच्या वतीने सातशे स्वयंसेवकांना भोजन देण्यात आले. उज्ज्वल फलटने, विवेक प्रधान यांनी नियोजन केले. भूषण बडदे, अमर तुपे यांनी सुमारे दोन हजार स्वयंसेवकांना फराळाची व्यवस्था केली होती.

UPN24B55937, UPN24B55938

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.