श्री जगन्नाथ रथयात्रा महामहोत्सव रविवारी

श्री जगन्नाथ रथयात्रा महामहोत्सव रविवारी
Published on

पुणे, ता. ३ : ओडिशामधील जगन्नाथ पुरी येथील रथयात्रेच्या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय कृष्णभावनामृत संघ - इस्कॉन, पुणे यांच्यातर्फे जगन्नाथ रथयात्रा सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. रविवारी (ता. ७) दुपारी एक वाजता टिळक रस्ता येथील स. प. महाविद्यालय येथून या सोहळ्याला प्रारंभ होणार आहे, अशी माहिती इस्कॉन मंदिराचे प्रवक्ते जनार्दन चितोडे आणि उपाध्यक्ष संजय भोसले यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी रथयात्रा समन्वयक अनंतगोप प्रभू आणि संपर्क प्रमुख प्रसाद कारखानीस उपस्थित होते.

भोसले म्हणाले, ‘‘जगन्नाथ पुरी येथे शतकानुशतके ही रथयात्रा काढली जाते. जगन्नाथ पुरी येथे प्रत्येकजण वैयक्तिकरित्या जाऊ शकत नाही. त्यामुळे इस्कॉनचे संस्थापक स्वामी प्रभुपाद यांनी ही रथयात्रा सुरू केली. स. प. महाविद्यालय, बाजीराव रस्ता, लक्ष्मी रस्ता, बालगंधर्व रंगमंदिर, जंगली महाराज रस्ता, टिळक चौक, टिळक रस्तामार्गे स. प. महाविद्यालय येथे रथयात्रेचा समारोप होणार आहे. सायंकाळी सात वाजता आरती, दर्शन व महाप्रसादाचे आयोजन केले आहे. नागरिकांनी या रथयात्रेत सहभागी व्हावे.’’

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.