नानासाहेब पेशवे यांच्या 
पुण्यतिथीनिमित्त व्याख्यान

नानासाहेब पेशवे यांच्या पुण्यतिथीनिमित्त व्याख्यान

Published on

पुणे, ता. ३ : श्रीमंत नानासाहेब पेशवे यांच्या रूपाने भारताला अत्यंत कुशल प्रशासक मिळाले. मराठ्यांचे सामर्थ्य नानासाहेबांच्या काळात वाढले. परंतु दुर्दैवाने त्यांचे जे कर्तृत्व होते ते संपूर्ण भारतात पोहोचवायला आपण कमी पडलो. त्यांचे उचित स्मारकही झाले नाही, अशी खंत इतिहास अभ्यासक मोहन शेटे यांनी व्यक्त केली.
श्री देवदेवेश्वर संस्थान, पर्वती व कोथरूड पुणे यांच्या वतीने श्रीमंत नानासाहेब पेशवे यांच्या २६३ व्या पुण्यतिथीनिमित्त मोहन शेटे यांच्या व्याख्यानाचे आयोजन सारसबाग गणपती मंदिर प्रांगणात केले होते. यावेळी संस्थानचे मुख्य विश्वस्त रमेश भागवत, विश्वस्त जगन्नाथ लडकत, पुष्करसिंह पेशवा, पालखेड स्मारक समितीचे प्रशांत गोऱ्हे, हेमंत तांबोलकर, विद्या घटवाई तसेच किशोर ऐनपुरे उपस्थित होते.
जगन्नाथ लडकत म्हणाले, ‘‘नानासाहेब पेशवे यांचे कार्य देदीप्यमान आहे. त्यांच्या कार्याची माहिती लोकांना कळावी यासाठी विविध उपक्रमांचे आयोजन संस्थानच्या वतीने करण्यात येते.’’ यानिमित्त धार्मिक कार्यक्रमांचे आयोजनही पर्वतीवर करण्यात आले. स्वागत व आभार रमेश भागवत मानले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.