बाल्कनी गार्डन कार्यशाळा

बाल्कनी गार्डन कार्यशाळा

Published on

पुणे, ता. ३ : बाल्कनीला छोट्याशा गार्डनचे रूप देऊन निसर्गाचे सान्निध्य मिळवण्याची संधी देणारी तीन तासांची ऑनलाइन कार्यशाळा शनिवारी (ता. ६) होणार आहे. या कार्यशाळेत घराची बाल्कनी हिरव्यागार निसर्ग रचनेत कशी बदलायची, मर्यादित जागेत फुले, औषधी वनस्पती आणि भाज्या कशा वाढवायच्या, जागा वापराचे मूल्यांकन, बाल्कनी गार्डनिंगसाठी योग्य वनस्पतींची निवड, रोपांची मूलभूत काळजी, पाणी, खत व छाटणी व्यवस्थापन, सूर्यप्रकाश व शेडचा वापर, कीड व रोग व्यवस्थापन व एकंदर देखभाल याबाबत तज्ज्ञांचे मार्गदर्शन होणार आहे.
संपर्क : ९१४६०३८०३१

टेरॅरियम मेकिंग कार्यशाळा
घराची शोभा वाढवणारे टेरॅरियम घरच्याघरी सहज तयार करता येऊ शकतात आणि यासाठी लागणाऱ्या विविध वनस्पती कुठल्याही रोपवाटिकेत सहज उपलब्ध असतात. याबाबत मार्गदर्शन करणारी कार्यशाळा रविवारी (ता. ७) आयोजिली आहे. यात टेरॅरियमच्या अद्भुत जगाचा परिचय, इकोसिस्टमचे कार्य, योग्य कंटेनर व वनस्पती निवड, मातीची रचना व सब्सट्रेटची निवड, सजावटीचे घटक व लँडस्केपिंग, टेरॅरियम एकत्र करणे व लावणे, पाणी देण्याची आणि देखभाल पद्धती, कीटक व्यवस्थापन, प्रगत टेरॅरियम डिझाइन व तंत्र, टेरॅरियम लाइटिंग व पर्यावरणविषयक विचार, टेरॅरियम डिझाइनची तत्त्वे व सौंदर्यशास्त्र, टेरॅरियम थीम व प्रेरणा, टेरॅरियम विक्री व विपणन धोरणे आदींबाबत तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत.
संपर्क : ८९५६३४४४७२

फ्रोजन फूड व्यवसायातील संधी
अलीकडच्या काळामध्ये फ्रोजन फूडची खूप मोठी मागणी आहे. या पार्श्वभूमीवर या व्यवसायासंदर्भात माहिती देणारी एकदिवसीय कार्यशाळा रविवारी (ता. ७) आयोजिली आहे. यात फ्रोजन फूड म्हणजे काय हे सांगून व्हेजिटेबल टिक्की, बर्गर टिक्की, नगेट्स, व्हेजिटेबल नगेट्स, चीज नगेट्स, चिकन टिक्की, चिकन नगेट्स, फ्रोजन चपाती, फ्रोजन पराठा, फ्रोजन स्वीट कॉर्न, फ्रोजन मटार, फ्रोजन पायनापल, फ्रोजन व्हेजिटेबल हे फ्रोजन पदार्थ तयार करण्याच्या व्यावसायिक पद्धती व प्रिझर्वेशन शिकवले जाणार आहे. तसेच फ्रोजन फुडसाठी लागणाऱ्या मशिनरी, प्रोजेक्ट रिपोर्ट, लोगो, शासकीय अटी, नियम व लायसन, कॉस्टिंग, लेबलिंग, पॅकिंग, मार्केटिंग आणि हा व्यवसाय कसा सुरु करावा, याविषयी माहिती देण्यात येणार आहे.
संपर्क : ९३५६९७३४२७

रिअल इस्टेट मास्टरक्लास
मेंटॉरशिप प्रोग्रॅम सेमिनार
रिअल इस्टेट क्षेत्रात कौशल्य, भरपूर पैसे व नाव कमवायची इच्छा असणाऱ्यांसाठी तसेच आयुष्यभर स्थिर व्यवसाय हवा आहे, अशांसाठी रिअल इस्टेट मास्टरक्लास मेंटॉरशिप सर्टिफिकेशन प्रोग्रॅम सुरु होत आहे. यासाठी शिक्षणाचे कोणतेही निकष नाहीत किंवा वयाची अट नाही. तीन महिने क्लासरूम तसेच ऑनलाइन व त्यानंतर पुढील तीन महिने प्रात्यक्षिक असे प्रशिक्षणाचे स्वरूप असणार आहे. स्थिर व भरपूर पैसे देणाऱ्या करिअरच्या संधी शोधत असलेल्या सर्वच तरुणांसाठी अतिशय आदर्श आणि परिपूर्ण असे हे प्रशिक्षण असणार आहे. या संपूर्ण प्रशिक्षणासंदर्भात अधिक माहिती देणारा सेमिनार सोमवारी (ता. ८) दुपारी ३ ते सायंकाळी ६ यावेळेत होणार आहे. रिअल इस्टेट मास्टर ट्रेनर रोहित गायकवाड यामध्ये मार्गदर्शन करणार आहेत.
संपर्क : ८९५६३४४४७१
वरील सर्व कार्यशाळा व प्रशिक्षणे सशुल्क असून त्यांचे ठिकाण : सकाळ मीडिया सेंटर, सकाळनगर, गेट क्र. १, बाणेर रस्ता, औंध, पुणे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.