आषाढी वारीसाठी वाहनांना टोल माफ

आषाढी वारीसाठी वाहनांना टोल माफ

Published on

पुणे, ता. ३ : पंढरपूर येथील आषाढी वारीसाठी येणाऱ्या वाहनांना परतीच्या प्रवासासह टोलमाफी देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यानुसार वारकरी व भाविकांना ३ ते २१ जुलै या दरम्यान टोल माफ असणार आहे. वाहनांना पास संबंधित पोलिस ठाणे, पोलिस चौकी, आरटीओ कार्यालय किंवा वाहतूक शाखा येथून देण्यात यावेत, अशा सूचना सरकारने दिल्या आहेत.
आषाढी वारीसाठी पंढरपूरला जाणाऱ्या पालख्या तसेच भाविकांच्या व वारकऱ्यांच्या सोयीसुविधा व त्यांच्या वाहनांना पथकरातून सूट देणे आदींबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली जून महिन्यात बैठक झाली. या बैठकीत मुख्यमंत्री शिंदे यांनी वारीसाठी टोलमाफी देण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या होत्या. त्यानुसार सार्वजनिक बांधकाम विभागाचे अतिरिक्त सचिव ललितागौरी गिरीबुवा यांनी निर्णय जारी केला आहे. टोलमाफीसाठी पासेस देण्याचा नमुना सुद्धा जारी केला आहे. ही टोल सवलत हलक्या व जड वाहनांसाठीच असणार आहे.
टोलमाफी नसलेल्या एसटी बसलासुद्धा पंढरपूर मार्गावरील सर्व टोल नाक्यांवर या कालावधीत सवलत दिली जाणार आहे. एसटीच्या अधिकाऱ्यांनी गरजेप्रमाणे संबंधित पोलिस ठाण्यातून पास घेण्याच्या सूचना सरकारने दिल्या आहेत.
पोलिस प्रशासन, आरटीओ कार्यालय यांच्यामार्फत दिल्या जाणाऱ्या पासची संख्या एकत्रित माहिती रस्ते विकास महामंडळ, सार्वजनिक बांधकाम विभाग, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांना माहितीकरिता सादर करावी. जेणेकरून भाविक व वारकरी यांच्या वाहनांना सवलत दिल्यानंतर संबंधित टोल कंपनीला नुकसान भरपाई देण्यात येणार असल्याचे आदेशात म्हटले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.