विद्येच्या प्रांगणात

विद्येच्या प्रांगणात

सिग्नेट पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी
वारकऱ्यांचे केले स्वागत
पुणे, ता. ४ : हडपसरमधील जेएसपीएम सिग्नेट पब्लिक स्कूलमधील विद्यार्थ्यांनी पालखी सोहळा अनुभवला. संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी हडपसरमधून मार्गस्थ होत असताना सोनई गार्डन, सासवड रस्त्यावर विद्यार्थ्यांनी वारकऱ्यांचे स्वागत केले. जेएसपीएम हडपसर संकुलातील औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयातर्फे वारकऱ्यांना मोफत गोळ्या, औषधांचे वाटप करण्यात आले. सिग्नेट पब्लिक स्कूलच्या प्राचार्या कल्पना निलाखे, उपप्राचार्य काकोली महातो यांच्या मार्गदर्शनाखाली आणि कॅम्पस संचालक संजय सावंत यांच्या सहकार्याने हा उपक्रम राबविण्यात आला.
..............
गगनगिरी इंग्लिश मीडियम
स्कूलमध्ये पालखी सोहळा
पुणे, ता. ४ : संतोषनगरमधील महात्मा फुले विद्यानिकेतन संस्थेच्या गगनगिरी इंग्लिश मीडियम स्कूलच्या प्रांगणात पालखी सोहळा आयोजित करण्यात आला. शिक्षकांसह विद्यार्थ्यांनी रंगीबेरंगी कागदी दागिने आणि फुलांनी सजवलेली पालखी तयार केली होती. संस्थेच्या अध्यक्षा स्मिता वाघ, सचिव रवींद्र वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पालखी सोहळा आयोजित केला होता. यावेळी मुख्याध्यापिका संजीवनी सोनवलकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
...........
न्यू इंडिया स्कूलच्या विद्यार्थ्यांचे
शिष्यवृती परीक्षेत यश
पुणे, ता. ४ : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेतलेल्या इयत्ता पाचवी आणि आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत भुसारी कॉलनीतील राजा श्री शिवराय प्रतिष्ठानच्या न्यू इंडिया स्कूलच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश प्राप्त केले आहे. पाचवीतील २१ विद्यार्थ्यांना, तर आठवीतील १२ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळाली आहे. शहर विभागात गुणवत्ता यादीत आठवीच्या गौरी टिकार हिचा तालुकास्तरीय दुसरा क्रमांक, जिल्ह्यात १४ वा क्रमांक आणि राज्यात २५ वा क्रमांक आला आहे. आर्या आफळे हिचा जिल्ह्यात २६ वा क्रमांक आहे. प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका देवकी सुतार, ‘माध्यमिक’च्या मानसी मारुलकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
............
रामचंद्र राठी शाळेत
‘आनंददायी शनिवार’ साजरा
पुणे, ता. ४ : रामचंद्र राठी शाळेत मुख्याध्यापिका सीमा पवार यांच्या मार्गदर्शनानुसार ‘आनंददायी शनिवार’ उपक्रम राबविण्यात आला. पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी टेकडीवर चढणे आणि वर्षाविहार हे उपक्रम राबविण्यात आले. टेकडी चढणे, वनभोजन, निसर्गातील प्रत्येक घटकाची माहिती देणे, असा उपक्रम घेण्यात आला.
..........
सेंट जोसेफ शाळेत
पालखी सोहळा
पुणे, ता. ४ : घोरपडीतील सेंट जोसेफ शाळेत पालखी सोहळा मंगलमय वातावरणात साजरा करण्यात आला. इयत्ता नववीचे विद्यार्थी वारकऱ्यांची वेशभूषा करून सहभागी झाले होते. वर्गशिक्षिका पल्लवी बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम घेण्यात आला.
........
गिरमे विद्यालयात
साक्षरतेची वारी
पुणे, ता. ४ : वानवडीतील श्री ह.ब. गिरमे विद्यालयात विद्यार्थ्यांनी ‘वारी साक्षरतेची, वारी शिक्षणाची’ हा उपक्रम राबविला. विद्यालयातील प्रतीक नवघरे यांनी ‘गावातील शाळा, स्वच्छता पाळा’ या गीताद्वारे सामाजिक संदेश दिला. विद्यालयाच्या प्राचार्या विजया शिवरकर यांनी १५ वर्षांहून अधिक वयाच्या सर्वांना साक्षर करण्याचा संदेश दिला. कार्यक्रमास उपप्राचार्य विजय गोरे आणि शिक्षक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चिंतामणी घोडे यांनी केले.
...........
ॲबॅकस स्पर्धेत
जी चॅम्प सेंटरचे यश
पुणे, ता. ४ : संभाजीनगरमधील जी चॅम्प राज्यस्तरीय ॲबॅकस स्पर्धेत बिबवेवाडीतील जी चॅम्प सेंटरच्या मुलांनी यश मिळविले. स्पर्धेत शिवांक जगताप, आदिती रेणुसे, सावी लागू, प्रणीत बेंद्रे यांनी ट्रॉफी मिळवली. तर यश घोडके, रुद्र वरघडे यांनी प्रथम क्रमांक,
अधिराज माने याने दुसरा आणि आदित्य कोंडलकर यांनी तृतीय क्रमांक पटकाविला.
............
सोना ‘आई’ शाळेत
पालखी सोहळा उत्साहात
पुणे, ता. ४ : सोना ‘आई’ शाळेत पालखी सोहळा उत्साहात पार पडला. शाळेच्या ट्रस्टी सोनिया राव यांच्या हस्ते यावेळी पूजन करण्यात आले. शाळेचे संस्थापक ए. एल. नरसिंग राव, संस्थापिका स्वर्णा राव, विद्यार्थी, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी सहभागी झाले होते.
............
मराठे विद्यालयात रंगला
पर्यावरणपूरक पालखी सोहळा
पुणे, ता. ४ : खराडीतील सुंदराबाई मराठे विद्यालयात पर्यावरणपूरक पालखी सोहळा आयोजित करण्यात आला. यात इयत्ता सातवी आणि आठवीच्या २५० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. यानिमित्त विद्यार्थ्यांनी झाडे लावणे, नैसर्गिकरित्या बिया रुजविणे असा संदेश दिला. सीड बॉल, बियांची पाकिटे, कापडी पिशव्या यांचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे नियोजन शाळेचे मुख्याध्यापक संजय सोमवंशी, सांस्कृतिक विभाग प्रमुख विद्या कवेकर, मीनाक्षी शहापुरे, जेम्स साखरे, दीपक सोनवणे, रोहन खैरे, आशुतोष पवार, सचिन खांदवे, पर्यवेक्षक सुनील वळसे, संजय हुंबे यांनी केले.
..............
लोणकर माध्यमिक विद्यालयात
माजी विद्यार्थ्यांनी केले वह्यावाटप
पुणे, ता. ४ : वडगावशेरीमधील लोणकर माध्यमिक विद्यालयात २००३-०४ या वर्षातील माजी विद्यार्थ्यांनी २५० गरजू विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप केले. यावेळी ज्येष्ठ अध्यापक संजय अहिरे, विद्यालयाच्या प्रभारी प्राचार्या स्नेहल जाधव, हनुमंत लोखंडे, माजी विद्यार्थी शशिकांत कांबळे, अविनाश गलांडे, विवेकानंद पाटील उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यार्थी सागर वेताळ, शिक्षक अशोक मोरे, माजी विद्यार्थिनी समता गांधी यांनी केले. संगीता धामणे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com