प्रमाणपत्र नसलेल्या एजंटवर 
महारेराचा कारवाईचा बडगा

प्रमाणपत्र नसलेल्या एजंटवर महारेराचा कारवाईचा बडगा

Published on

पुणे, ता. ४ : प्रशिक्षण व प्रमाणपत्र नसणाऱ्या रिअल इस्टेट एजंटवर धडक कारवाई करत तब्बल २० हजार एजंटची नोंदणी महारेराने नुकतीच रद्द केली आहे. महारेराने आता नवीन एजंट नोंदणी व नोंदणीचे नूतनीकरण हे दोन्ही बंद केले आहे. यापुढे एजंटकडे सक्षमता प्रमाणपत्र असेल तरच नवीन नोंदणी करता येईल अथवा मुदत संपलेल्या नोंदणीचे नूतनीकरण करता येईल. ज्या नोंदणीकृत एजंटकडे सक्षमता प्रमाणपत्र नाही, त्यांची रेरा नोंदणी महारेराने रद्द केलेली आहे. नोंदणीकृत रेरा एजंट होण्यासाठी आता २० तासांचे प्रशिक्षण पूर्ण करून प्रमाणपत्र मिळवणे अत्यावश्यक आहे. ‘एसआयआयएलसी’तर्फे होणाऱ्या प्रशिक्षणाची ऑनलाइन व ऑफलाइन बॅच येत्या सोमवारी (ता. ८) सुरु होत आहे.
संपर्क : ८४८४८२२८५५

कंटेंट रायटिंग कार्यशाळा
सध्या डिजिटल माध्यमांमध्ये कंटेंट रायटर्सची भरपूर मागणी आहे. कमीत कमी शब्दात जास्तीत जास्त आशय सांगणाऱ्या, विषयाची संपूर्ण माहिती पोचविणाऱ्या कंटेंटचे लिखाण करणे प्रत्येकालाच योग्य प्रशिक्षण मिळाल्यास शक्य आहे. एचआर, मीडिया, मार्केटिंग, मॅनेजमेंट, ॲडमिन, ग्राफिक आणि डेटाशी संबंधित अनेक फील्ड आहेत, जिथे कंटेंट रायटर्ससाठी बऱ्याच करिअर संधी उपलब्ध आहेत. या पार्श्वभूमीवर सदर कार्यशाळा शनिवार (ता. ६) व रविवारी (ता. ७) आयोजिली आहे. यामध्ये कंटेंट रायटिंगची मूलभूत तत्त्वे, लेखनाचे तंत्र, कंटेंटचे संशोधन, योजना, लेखन, संपादन आणि ऑप्टिमाइझेशन करण्याची कौशल्ये, विशिष्ट प्रेक्षक आणि प्लॅटफॉर्मसाठी कंटेंट कसा लिहायचा, लिखाणासाठी एआयचा वापर, एसईओ आणि कंटेंट मार्केटिंग स्ट्रॅटेजी कशी वापरायची याबाबत प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
संपर्क : ८९५६३४४४७२

व्हिडिओ एडिटिंग कार्यशाळा
अनेकदा व्हिडिओ रेकॉर्ड केला जातो, मात्र तो एडिट करताना अडचण निर्माण होते. या पार्श्वभूमीवर सदर कार्यशाळेचे आयोजन ६, ७ तसेच १३, १४ जुलैला करण्यात आले आहे. कार्यशाळेत एडिटिंगचे महत्त्व, वंडरशेअर फिल्मोरा १२ व इनशॉट या दोन लोकप्रिय एडिटिंग साधनांचा वापर करून एडिटिंग कसे करावे, स्मार्ट एडिटिंगचे तंत्र, टाइमलाइनमध्ये क्लिप कट करणे, व्हिडिओमध्ये मजकूर व संगीत जोडणे, आवाजाचे एडिटिंग, ग्रीन स्क्रीन व क्रोमा कीइंग इफेक्ट, वेगवेगळे फिल्टर लावणे, मोशन ग्राफिक्स आणि व्हिज्युअल इफेक्ट्स,ऑडिओ ॲडजेस्टमेंट व व्हॉइसओव्हर, स्मार्टफोन वापरून लक्षवेधी व्हिडिओ तयार करण्यासाठीच्या टिप्स या विषयांवर प्रात्यक्षिकांसहित मार्गदर्शन होणार आहे. कार्यशाळा पूर्ण केल्यास इंटर्नशिपच्या संधीही उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.
संपर्क : ९३५६९७३४२७

इन्स्टंट लिक्विड ग्रेव्ही
रेडी टू कुक इन्स्टंट खाद्यपदार्थांना सध्याच्या धावपळीच्या युगात खूप महत्त्व आले आहे. दैनंदिन गरजेमुळे बाजारपेठेमध्ये या पदार्थांना मागणी असल्याने या क्षेत्रात व्यवसाय सुरु करण्यास संधी आहे. या पार्श्वभूमीवर व्यावसायिक स्वरूपातील कार्यशाळा शनिवारी (ता. ६) होणार आहे. यामध्ये पंजाबी रेड, हैदराबादी, व्हाइट, फिश करी, महाराष्ट्रीयन, सावजी, साऊथ इंडियन या ग्रेव्ही तसेच इडली-डोसा पीठ, आले-लसूण पेस्ट व कोल्हापुरी तांबडा व पांढरा रस्सा प्रात्यक्षिकासह शिकवले जाणार आहे. तसेच याचा व्यवसाय कसा उभारावा, बाजारपेठ, पॅकेजिंग, लेबलिंग, कॉस्टिंग, मार्केटिंग, फायनान्स आदींची माहिती दिली जाणार आहे. प्रतिव्यक्ती शुल्क दोन हजार रुपये.
संपर्क : ९१४६०३८०३१
वरील सर्व कार्यशाळा व प्रशिक्षणे सशुल्क असून त्यांचे ठिकाण : सकाळ मीडिया सेंटर, सकाळनगर, गेट क्र. १, बाणेर रस्ता, औंध, पुणे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.