श्री जगन्नाथ रथयात्रा महोत्सव रविवारी

श्री जगन्नाथ रथयात्रा 
महोत्सव रविवारी
Published on

पुणे, ता. ४ : ओडिसामधील जगन्नाथ पुरी येथील रथयात्रा मोठ्या उत्साहात साजरी होते. त्याच पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय कृष्णभावनामृत संघ इस्कॉनतर्फे श्री जगन्नाथ रथयात्रा महोत्सवाचे आयोजन केले आहे. जगन्नाथ रथयात्रा सोहळ्याला रविवारी (ता. ७) दुपारी १ वाजता टिळक रस्त्यावरील स. प. महाविद्यालय येथून प्रारंभ होणार आहे, अशी माहिती इस्कॉन मंदिराचे प्रवक्ते जनार्दन चितोडे आणि उपाध्यक्ष संजय भोसले यांनी पत्रकार परिषदेत दिली. या वेळी रथयात्रा समन्वयक अनंतगोप प्रभू आणि संपर्क प्रमुख प्रसाद कारखानीस उपस्थित होते.
राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सल्लागार मंडळाचे सदस्य राजेश पांडे, केंद्रीय सहकार व विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, इस्कॉन संस्थेचे संन्यासी कृष्णचंद्र महाराज, प्रबोधनंद स्वामी, श्रीकृष्ण चैतन्य स्वामी आणि इस्कॉन मंदिराचे अध्यक्ष राधेश्याम प्रभू यांच्या हस्ते रथयात्रा सुरु होईल. स. प. महाविद्यालय, अभिनव महाविद्यालय चौक, बाजीराव रस्तामार्गे लक्ष्मी रस्ता, बालगंधर्व रंगमंदिर, जंगली महाराज रस्ता टिळक रस्तामार्गे स. प. महाविद्यालय येथे रथयात्रेची सांगता होईल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.