नृत्यावली कार्यक्रमाचे
उद्या सादरीकरण होणार

नृत्यावली कार्यक्रमाचे उद्या सादरीकरण होणार

पुणे, ता. ५ ः नुपूरनाद अकादमीने रविवारी (ता. ७) ‘नृत्यावली’ या भरतनाट्यम् नृत्य कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. संस्था यावर्षी ३६ व्या वर्षात पदार्पण करीत आहे. यानिमित्त टिळक रस्त्यावरील टिळक स्मारक मंदिरात सकाळी ९.३० वाजता वार्षिक संमेलनात हा कार्यक्रम होईल. अकादमीच्या २० शाखांमधील २०० विद्यार्थिनी या वेळी सादरीकरण करतील. अकादमीच्या संचालक डॉ. स्वाती दैठणकर आणि नूपुर दैठणकर यांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले आहे. पारंपरिक भरतनाट्यम् रचनांसह काही नवीन संरचना या वेळी सादर होतील.
-----

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com