अवती भवती

अवती भवती

Published on

रोटरी क्लबतर्फे
वारकऱ्यांना मदत
पुणे, ता. ५ : आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी रोटरी क्लब ऑफ पुणे प्राईमसिटीने अल्पोपाहार भोजन आणि राहण्याची व्यवस्था केली होती. २०० वारकऱ्यांनी याचा लाभ घेतला. मुक्कामाच्या ठिकाणी प्रवचनही झाले. क्लबचे अध्यक्ष अतुल सलाग्रे यांनी वारकऱ्यांचे स्वागत केले. गेली आठ वर्षे हा उपक्रम राबविला जात असल्याचे त्यांनी सांगितले. यासाठी संजय आढाव व विद्या आढाव यांनी पुढाकार घेतला. याशिवाय रमेश बेंद्रे, मकरंद भिडे, कौस्तुभ सातपुते, संपदा भिडे, उदय शेटे, श्याम निकाळजे आदींचा सहभाग होता. या वेळी वारकऱ्यांना ताडपत्री, तंबूंचे वस्तूंचे वाटप करण्यात आले. वारकऱ्यांची मोफत वैद्यकीय तपासणीही झाली.
.........
चंदगड संघातर्फे
वारकऱ्यांना खजूर
पुणे, ता. ५ : चंदगड तालुका नागरिक रहिवासी संघातर्फे दिवे घाट येथे वारकऱ्यांना खजूर आणि पाण्याच्या पाण्याच्या बाटल्यांचे वाटप करण्यात आले. या वेळी संघाचे अध्यक्ष मारुती शिट्याळकर, उपाध्यक्ष मारुती पाटील, सचिव विजय गावडे, खजिनदार राजू गोरल, कार्याध्यक्ष सुरेश नेसरकर, अनिल दळवी, लक्ष्मण सावत, संतोष गावडे, विनायक अमृसकर आदींनी सहकार्य केले.
......
आडवळकर केंद्रातर्फे
वारकऱ्यांना निसर्गोपचार
पुणे, ता. ५ : आडवळकर निसर्गोपचार केंद्रातर्फे सासवड येथे वारकऱ्यांना मसाज, ॲक्युप्रेशर, फिजिओथेरपी आदी नैसगिक उपचार सेवा देण्यात आली, अशी माहिती डॉ. महेश आडवळकर, डॉ. प्रशांत खटपकर, गजानन पाटील आणि संतोष ढोबळे यांनी दिली.
......
ढाकाळेत रक्तदान शिबिर
पुणे, ता. ५ : लोकनेते डॉ. बाळासाहेब विखे पाटील सेवाभावी संस्थेच्यावतीने ढाकाळे गावामध्ये रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले. माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम झाला. या वेळी डेगाव पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी प्रमिला वाळुंज, सरपंच धोंडीबा लांघी, ग्रामसेवक शारदा घोडे, संस्थेचे संचालक मंडळ अध्यक्ष बाळासाहेब साळवे, कार्याध्यक्ष संजय मगर, सचिव मधुकर कदम, उपसचिव चेतन गव्हाणे आदी उपस्थित होते.
.....
पुणे विद्यार्थी गृहाचे
डिप्लोममध्ये यश
पुणे, ता. ५ : महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ, मुंबई यांच्या वतीने घेण्यात आलेल्या पदविका अभियांत्रिकी उन्हाळी परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला. यात पुणे विद्यार्थी गृहाच्या महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ प्रिंटिंग टेक्नॉलॉजी संस्थेतील तृतीय वर्ष डिप्लोमा इन प्रिंटिंग टेक्नॉलॉजी विभागाचा शंभर टक्के निकाल लागला. यामध्ये सौरव वानखेडे याने प्रथम क्रमांक, वैभव लिंगशेट्टी व अभिषेक दासखेडकर यांनी द्वितीय क्रमांक व साक्षी सोनावणे हिने तृतीय क्रमांक पटकाविला. ६० पैकी ४८ विद्यार्थ्यांनी ७५ टक्क्यांपेक्षा जास्त गुण संपादन केले आहे. प्रथम श्रेणीमध्ये १२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. संस्थेचे कार्याध्यक्ष राजेंद्र बोऱ्हाडे, संजय गुंजाळ, डॉ. राजेंद्र कांबळे, प्राचार्य परमेश्वर शिंदे तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर सेवकांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
.....

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.