कादंबरी वाचनातून उलगडले 
परसबागेशी मानवी नाते

कादंबरी वाचनातून उलगडले परसबागेशी मानवी नाते

Published on

पुणे, ता. ५ : ‘जीविधा’ संस्थेतर्फे आयोजित ‘हिरवाई महोत्सवा’त लेखिका मृणालिनी वनारसे यांनी त्यांच्या ‘सोनवारा - अर्थात बागेतल्या रानव्याची गोष्ट’ या कादंबरीचे वाचन केले. या वाचनातून पर्यावरण आणि मानवी नात्याची गोष्ट उलगडली.
‘जीविधा’च्या वतीने राजीव पंडित, वृंदा पंडित यांनी वनारसे यांचे स्वागत केले. उद्याननिर्मितीचा इतिहास, उद्यानाशी संबंधित शब्दांचे अर्थ याचा शोध घेत वनारसे यांचे वाचन रंगले. घरच्या बागेशी जुळलेले ऋणानुबंध आणि त्यामागचे तरल विचार यातून पर्यावरणप्रेमी रसिकांसमोर आले. ‘जीविधा’च्या हिरवाई महोत्सवाचे हे १६ वे वर्ष आहे. सदाशिव पेठेतील भावे प्राथमिक शाळेच्या नवीन सभागृहात रविवारपर्यंत सायंकाळी ६.३० ते ८ या वेळेत महोत्सवातील व्याख्याने होणार आहेत. शनिवारी (ता. ६) ‘उत्क्रांतीच्या पाऊलखुणा - पाषाणातील वनस्पती जीवाश्म’ या विषयावर प्रा. प्र. के. घाणेकर यांचे व्याख्यान होणार असून रविवारी (ता. ७) राजीव पंडित व अनुज खरे यांच्या पुस्तकाचे प्रकाशन व त्यांची मुलाखत होणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.