तलाठी भरतीचा मार्ग मोकळा

तलाठी भरतीचा मार्ग मोकळा

Published on

पुणे, ता. ५ : तलाठी भरती प्रक्रियेबाबत महाराष्ट्र प्रशासकीय प्राधिकरणाने (मॅट) पेसा कायद्यांतर्गत असलेल्या पदांबाबत आणि माजी सैनिक समांतर आरक्षण प्रवर्गातील पदे वगळता बिगर पेसा क्षेत्रातील पदे नियमानुसार भरण्यास मान्यता दिली आहे. त्यामुळे जिह्यातील तलाठी पदाच्या ३८५ जागांपैकी ३१५ पात्र उमेदवारांना नियुक्ती पत्रे देण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
गुणवत्ता यादीनुसार अंशकालीन, प्रकल्पग्रस्त, दिव्यांग, भूकंपग्रस्त, खेळाडू आदी प्रवर्गातील पात्र ठरलेल्या उमेदवारांच्या कागदपत्रांची तपासणी नियुक्ती पत्र देण्यात येणार आहे. तर १५ पदे ही पेसा कायद्यांतर्गत आणि ५५ पदे माजी सैनिक समांतर आरक्षण प्रश्नांबाबत न्यायालयाच्या निकालानंतर निर्णय घेण्यात येणार आहे. तलाठी भरती परीक्षेची मार्चमध्ये गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात आली. पेसा आणि सैनिक प्रवर्गातील पदांबाबत न्यायालयात याचिका दाखल झाली होती. त्यामुळे प्रशासकीय प्राधिकरणाने पेसांतर्गत १३ जिह्यांतील क्षेत्र वगळता बिगर पेसा क्षेत्रातील आणि माजी सैनिक प्रवर्गातील पदे वगळता इतर प्रवर्गातील पदभरती प्रक्रिया राबविण्यासंदर्भात निकाल दिला आहे. त्यानुसार राज्य सरकारच्या कार्यासन अधिकारी शीतल माने यांनी तलाठी भरती परीक्षेतील गुणवत्ता यादीनुसार पात्र उमेदवारांची भरती प्रक्रिया सुरू करावी, असे आदेश दिले आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.