दोन अपघातांत दोन तरुणांचा मृत्यू

दोन अपघातांत दोन तरुणांचा मृत्यू

पुणे, ता. ५ : शहराच्या वेगवेगळ्या भागात झालेल्या अपघातांमध्ये दोन तरुणांना आपला जीव गमवावा लागला. याप्रकरणी चतुःशृंगी व शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
बाणेर येथे भरधाव डंपरने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात ३४ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. अभिषेक मनोज सरनाईक (वय ३४, रा. ननावरे ब्रिज जवळ सुसगाव) असे अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. ही घटना गुरुवारी (ता.४) रोजी घडली. याप्रकरणी प्रदीप कृष्णराव पांढरकर (वय ६४, रा. यवतमाळ) यांनी चतुःशृंगी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यावरून अज्ञात डंपर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मनपा येथे दुचाकी घसरून झालेल्या अपघातात दुचाकीवरील सहप्रवासी तरुणाचा मृत्यू झाला आहे. वरद शैलेंद्र नाईक (वय २३, रा. येवलेवाडी) असे दुचाकी घसरून मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी कादंबरी शैलेंद्र नाईक (वय २५) यांनी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून यश पांचपोळ (रा. शनिवार पेठ) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com