सर्व आवृत्यांसाठी SIILC च्या लोगोसह वापरावी

सर्व आवृत्यांसाठी SIILC च्या लोगोसह वापरावी

थेट बेकरी इंडस्ट्रीमध्ये
बेकरी उत्पादन प्रशिक्षण
वाढत्या मागणीमुळे बेकरी उत्पादनांना चांगली बाजारपेठ आहे. भरपूर संधी असणाऱ्या या व्यवसायाबाबत प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन करणारे प्रशिक्षण १३ व १४ जुलै रोजी आयोजिले आहे. प्रशिक्षणात बेकरीमध्ये तयार केली जाणारी टोस्ट, पाव, बन, केक, बिस्कीट तसेच केक व बिस्किटची सजावट आदी उत्पादने, नवीन बेकरी उद्योग सुरू करण्याचे तंत्र व त्याचे व्यवस्थापन, मूल्यवर्धित पदार्थ बनवण्याचे तंत्र, त्यासाठी लागणारी यंत्रे, पायाभूत सुविधा, प्रोजेक्ट प्लॅनिंग, पॅकेजिंग, लेबलिंग इ. विषयी मार्गदर्शन होणार आहे. या लघु उद्योगासाठी अंदाजे गुंतवणूक इ.विषयी मार्गदर्शन होणार आहे. थेट बेकरी इंडस्ट्रीमध्ये प्रॉडक्ट्सचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक पाहतानाच हॅन्डस ऑन ट्रेनिंग दिले जाणार आहे.
संपर्क : ९१४६०३८०३१

लाकडी घाणा खाद्य तेल उत्पादन प्रशिक्षण
आरोग्यदायी लाकडी घाणा अथवा कोल्ड प्रेस्ड खाद्य तेलाला मागणी वाढली आहे. ग्रामीण व शहरी भागात हा उद्योग सुरू करण्याची मोठी संधी सध्या उपलब्ध आहे. यासंदर्भात प्रात्यक्षिकांवर आधारित प्रशिक्षण १३ व १४ जुलै रोजी आयोजिले आहे. प्रशिक्षणात लाकडी घाण्यावर तेल उत्पादन कसे घेतात याविषयी प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन होणार आहे. प्रशिक्षणात कोल्ड प्रेस्ड तेल उत्पादन कसे घेतात, तेलबियांच्या जाती व तेल उद्योगातील संधी, तेलाचे पॅकिंग व ब्रॅण्डींग, आवश्यक मशिनरी, मशिन मेंटेनन्स, पेंड प्रक्रिया व विक्री, व्यवसायाचे अर्थशास्त्र, कामगार प्रशिक्षण, सोशल मिडीयाद्वारे मार्केटिंगच्या पद्धती आदींविषयी मार्गदर्शन होणार आहे.
संपर्क ः ८९५६३४४४७२

विक्री व्यवस्थापन कौशल्य प्रशिक्षण
प्रत्येक कंपनी अथवा उद्योगांमध्ये उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी ‘विक्री’ हा एक मूलभूत घटक आहे. कंपनीचे मुख्य उद्दिष्ट साध्य करण्यासाठी विक्री प्रशिक्षण आवश्यक आणि खूप महत्त्वाचे आहे. विक्री प्रशिक्षणामध्ये जास्तीत जास्त विक्री शक्य करण्यासाठी आवश्यक साधने, संकल्पना, क्षमता आणि कौशल्ये प्रदान केली जातात, ज्यामुळे अधिक विक्री होऊन विक्रेते आणि उद्योग-व्यवसाय दोघांचाही नफा वाढतो. या पार्श्वभूमीवर विक्री यशस्वी करण्यासाठीचे सर्वसमावेशक विक्री प्रशिक्षण १४ जुलै रोजी आयोजिले आहे. या प्रशिक्षणाद्वारे परिणामकारक विक्री कशी करावी व विक्रीचे उद्दिष्ट कसे साध्य करावे याबाबत प्रात्यक्षिक सराव सत्रांसह मार्गदर्शन होणार आहे. यामध्ये विक्रीपूर्व नियोजन, विक्रीची मूलभूत तत्त्वे, संभाषण कौशल्य, ऐकण्याचे कौशल्य, नोट्स कशा घ्याव्यात, बँकेसोबतचे व सरकारी संस्थेसोबतचे व्यवहार कसे हाताळावे, टेलीकॉलिंगवर बोलण्याची पद्धत, वाटाघाटी कशा कराव्यात, डेटा मॅनेजमेंट यांसह व्यावसायिक विक्री कौशल्ये शिकवली जाणार आहेत.
संपर्क : ९३५६९७३४२७.

----------------------------------
वरील सर्व कार्यशाळा व प्रशिक्षणे सशुल्क असून त्यांचे ठिकाण ः सकाळ मीडिया सेंटर, सकाळ नगर, गेट क्र. १, बाणेर रस्ता, औंध, पुणे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com