कॉँग्रेसची इच्छुकांकडून अर्ज मागविण्यास सुरुवात

कॉँग्रेसची इच्छुकांकडून अर्ज मागविण्यास सुरुवात

Published on

पुणे, ता. ६ : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी शहर काँग्रेसतर्फे तयारी सुरू करण्यात आली आहे. पक्षाने शहरातील आठही विधानसभा मतदारसंघातून इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यास सुरुवात केली आहे. इच्छुकांनी सोमवारपर्यंत (ता. ८) पक्षाकडे अर्ज दाखल करावेत, असे आवाहन शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी केले आहे.
विधानसभेची निवडणूक सप्टेंबर-ऑक्टोबरदरम्यान होण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांच्या आदेशावरून शहर काँग्रेसने आठही मतदारसंघातून इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविले आहेत. अर्ज काँग्रेस भवनात सोमवारपर्यंत जमा करावयाचे आहेत. दाखल अर्ज प्रदेश काँग्रेस समितीकडे पाठविण्यात येतील, असे शिंदे यांनी सांगितले. विधानसभा निवडणूक लोकसभेप्रमाणे लढवायची की स्वतंत्रपणे? यासंदर्भातील निर्णय पक्षाच्या वरिष्ठ पातळीवर घेतला जाणार आहे. परंतु पक्षाने आठही विधानसभा मतदारसंघात लढण्याची तयारी सुरू केली आहे. त्यानुसार ही प्रक्रिया सुरू केली आहे, असेही शिंदे यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.