महसूल गुप्तचर यंत्रणेने आठ कोटींचे रक्तचंदन पकडले

महसूल गुप्तचर यंत्रणेने आठ कोटींचे रक्तचंदन पकडले

Published on

पुणे, ता. ७ : नवी मुंबईतील जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टच्या बंदरातून (जेएनपीटी) महसूल गुप्तचर संचालनालयाच्या (डीआरआय) पुणे कार्यालयातील पथकाने कारवाई करून आठ टन रक्तचंदन जप्त केले. या प्रकरणी पाच जणांना अटक करण्यात आली असून, जप्त करण्यात आलेल्या रक्तचंदनाची आंतरराष्ट्रीय बाजारात सात कोटी ९० लाख रुपये एवढी किंमत आहे.

नवी मुंबईतील जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टच्या बंदरातून परदेशात जहाजातून रक्तचंदन पाठविण्यात येणार आहे, अशी माहिती महसूल गुप्तचर संचालनालयाच्या पथकाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे रक्तचंदन घेऊन बंदरात निघालेला कंटेनर पथकाने अडवला. कंटेनरची तपासणी करण्यात आली. तेव्हा सहा टन रक्तचंदन सापडले. पथकाने निर्यातदार, दलाल, गोदाम व्यवस्थापक आणि वाहतूकदारासह पाच जणांना अटक केली. आरोपींकडे करण्यात आलेल्या चौकशीनंतर पथकाने अहमदनगर, नाशिक आणि हैदराबाद येथे कारवाई केली आहे. नाशिक येथील एका गोदामावर छापा टाकण्यात आला. तेथून दोन टन रक्तचंदन जप्त करण्यात आले. या गुन्ह्यात अटक करण्यात आलेल्या आरोपींना न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.